coronavirus : जळगावात दुबई, चीनमधून परतलेले संशयित अधिक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

जळगाव  : सध्या कोरोना व्हायरसने देशासह जगभरात थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे सुमारे 15 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यातील 10 जणांचे अहवाल "निगेटिव्ह' आले असून, उर्वरित 2 जणांचे अहवाल आज येणार आहेत. हे संशयित दुबईसह चीनमधून आल्याची माहिती समोर आली आहे. 

जळगाव  : सध्या कोरोना व्हायरसने देशासह जगभरात थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे सुमारे 15 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यातील 10 जणांचे अहवाल "निगेटिव्ह' आले असून, उर्वरित 2 जणांचे अहवाल आज येणार आहेत. हे संशयित दुबईसह चीनमधून आल्याची माहिती समोर आली आहे. 

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने आक्रमण केले असून, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. परदेशात नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी स्थायिक झालेले देखील मायदेशी परतू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 12 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यातील 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, आज दोन रुग्णांचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार आहेत. 

दोघांचे नमुने पाठविणार 
गेल्या दोन, तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये परदेशातून व पुणे, मुंबई यासह इतर राज्यात स्थायिक झालेल्यांची संख्या अधिक आहे. बाकू देशातून परतलेले दाम्पत्य हे भुसावळ येथील रहिवासी असून, आज जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात हे दाम्पत्य दाखल झाले आहे. या दाम्पत्याची तपासणी करण्यासाठी त्यांचे स्वॅपचे नमुने पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली. 

स्पेनमधील विद्यार्थी स्वत:हून दाखल 
स्पेन येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी गेल्या चार दिवसांपूर्वी शहरात आला होता. आज हा विद्यार्थी कोरोनाची तपासणी करण्यासाठी स्वत:हून जिल्हा रुग्णालयात दाखल झाला आहे. रुग्णालय प्रशासनाने या रुग्णास आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करून घेतले असून, त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. तसेच आतापर्यंत सुमारे चार संशयितांना आयसोलेशनमध्ये दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. 

तेरा संशयित आले विदेशातून 
जिल्ह्यातील बहुतांश नागरिक नोकरीसाठी परदेशात स्थायिक झाले आहेत. कोरोनामुळे अनेक जण आपल्या मूळगावी परतले आहे. गेल्या काही दिवसांत परदेशातून जिल्ह्यात येणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. यातच जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात कोरोनाचे 12 संशयित हे विदेशातून आले असून, यामध्ये 5 संशयित चीन, 5 जण दुबई, 2 संशयित हे जर्मनीतून तर 1 संशयित स्पेनमधून जिल्ह्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon More suspects returning from Dubai, China in the district