बंदुकीच्या टोकावर भामट्यांनी पळवली कार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

जळगाव : शहरातील आदर्शनगरातील रहिवासी तथा ट्रान्सपोर्ट व्यवसायीक नरेंद्र ठाकुर (वय 49) सकाळी सहा वाजता मेहरुण चौपाटीवर मॉर्निंग वॉकसाठी गेले असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवुन त्यांची लूट केली. एकाने तोंडावर मिरचीस्प्रे फवारला तर दुसऱ्याने गाडीची चावी हिसकावुन खिशातील दोन हजार रुपये काढून घेत पोबारा केला. घटनेची माहिती कळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तत्पुर्वीच ठाकुर यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. 

जळगाव शहरातील मेहरुण चौपाटीवर पहाटे पाच वाजेपासुनच जेष्ठ नागरीकांची मॉर्निंग वॉकसाठी गर्दी होत असते. निसर्गरम्य वातावरण आणि ताज्या हवेसाठी परिसरातील नागरीकांचा राबता वाढला आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे नरेंद्र बहादुरसिंग ठाकुर आपल्या होंडा सिटी कार क्र (एमएच.19बी.यु.3765) घेवुन सहा वाजता मेहरुण चौपाटीवर पोहचले, समवयस्क जेष्ठासह वॉक करीत असतांना ठाकुर यांच्यापुढे 20 ते 25 फुटावरच सुभाष तोतला, जगन्नाथ महाजन असे चालत होते. वॉक सुरु केल्यावर काही वेळातच मोटारसायकलीवर स्वार दोन तरुण ठाकुर यांच्याजवळ आले व ओय गाडीकी चाबी दे..रे! असे म्हणत एकाने रिव्हॉल्वरच्या बटने ठाकुर यांच्या डोक्‍यावर मागून प्रहार केला. तर दुसऱ्याने "चिलीस्प्रे' (मिरची स्प्रे) संपुर्ण चेहऱ्यावर फवरल्यानंतर रिव्हॉल्वर चे टोक डोक्‍यावर ठेवतच अंगझडती घेत दोन हजार रुपये रोख व होंडा सिटी कारची चावी काढून नेली. तोंडावर लालसर स्प्रे मारलेला आणि बराचवेळ श्री ठाकुर तसेच डोळेबंद करुन उभे राहिले दोघे लूटारू गेल्याची चाहूल लांगल्यावर त्यांनी मदतीसाठी आरडा ओरड केला. सोबच्या मित्रांनी धाव घेत त्यांना तत्काळ डॉ.जैन यांच्याकडे दाखल करुन पोलिसांना घटना कळवली.

Web Title: marathi news jalgaon morning wok revolver