"मनपा'चे मजले भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

जळगाव ः महापालिकेच्या 17 इमारतीचे काही मजले भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात महापौर सीमा भोळे यांनी नगररचना विभागाकडे इमारतीचे भोगवट प्रमाणपत्र आहे का? याची माहिती मागितली 
होती. मात्र, शासकीय इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र आवश्‍यक नसल्याचा खुलासा सहाय्यक नगररचनाकार यांच्याकडून आल्याने महापालिकेचे मजले भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

महापालिकेची सरदार वल्लभभाई पटेल टॉवर 17 मजली प्रशासकीय इमारत आहे. इमारतीच्या किती मजल्यांना बांधकाम परवानगी आहे, तसेच भोगवटा प्रमाणपत्र आहे का? या संदर्भात विचारणा करण्यासाठी महापौरांनी भोळे यांना नगररचना विभागाला दिले होते. यावर नगररचनाकार यांनी खुलासा पाठविला असून, यासाठी एमआरटीपी ऍक्‍ट 1996च्या कलम 58 प्रमाणे भोगवटा प्रमाणपत्राची आवश्‍यकता नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दहाव्या मजल्यापासून वरील रिक्त मजले व्यावसायिकांना भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon muncipal corporation