मनपातील सर्व रेकॉर्ड होणार "डिजिटल' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

जळगाव ः महापालिकेतील नगरचना विभागासह अन्य महत्त्वाच्या विभागातून फाइल्स, तसेच महत्त्वाचे दस्तऐवज गहाळ होत असतात. जन्म- मृत्यू विभागात तर जुन्या नोंदीचे रजिष्टर हरविल्याने नागरिकांना जन्म मृत्यूच्या प्रमाणपत्र मिळण्यास मोठा त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने सर्व जुने 
कागदपत्र व रेकार्डचे स्कॅनिंग करून ते डिजिटल स्वरूपात केले जाणार आहे. एक- दोन दिवसात टेंडर दिलेल्या संस्थेकडून कामाला सुरवात होणार आहे. 

महापालिकेतील विविध विभागात वर्षानुवर्षे अनेक कागदपत्रांचे गठ्ठे पडलेले आहेत. त्यात अनेक महत्त्वाच्या विभागातून फाइल्स व त्यातील कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर उघडकीस आले. तसेच जन्म - मृत्यू विभागात 70 ते 80 वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड अत्यंत जीर्ण झाले आहे. काही रजिस्टर गहाळ झाले आहेत. महापालिकेकडे 1901 पासूनचे रेकॉर्ड आहे. जुने रजिस्टर असल्याने ते आता 
जीर्ण झाले आहेत. अनेकांची पाने गायब झाली आहेत. काहींची पाने फाटली आहेत. यामुळे जन्म- मृत्यू विभागातील नोंदी आढळत नसल्याने नागरिकांना दाखल्यांसाठी चकरा माराव्या लागत आहेत. 

पुण्याच्या संस्थेला मिळाले काम 
कागदपत्र न मिळणे या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागातील कागदपत्रांचे "स्कॅनिंग' करून सॉफ्ट कॉपीमध्ये ही नोंद ठेवली जाणार आहे. त्यासाठी पुणे येथील एका संस्थेला ही निविदा देण्यात आली असून, या संस्थेतर्फे येत्या एक किंवा दोन दिवसांत कामाला सुरवात होणार आहे. त्यासाठी लागणारी अत्याधुनिक यंत्रणा कंपनीने सोळाव्या मजल्यावरील सभागृहात केली आहे. 

एका क्‍लिकवर माहिती 
महापालिकेत असलेल्या सर्व जुन्या कागदपत्रांची स्कॅनिंग यंत्रणेद्वारे केले जाणार आहे. ही सर्व माहिती ऑनलाइन पद्धतीने प्रशासकीय कामकाजासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे फाइल्स गहाळ झाली, कागदपत्रे सापडत नाही, असे कारणे राहणार नाही. त्यामुळे सर्व विभागाची माहिती ही एका क्‍लिकवर मिळणार आहे असून, महापालिकेचा कारभार गतिमान होणार आहे. 

वीस हजार जुने कागदपत्रे 
महापालिकेत सुमारे लहान-मोठे 20 विभाग असून, दररोज या विभागांमध्ये कागदोपत्री व्यवहारात नोंदी होत आहे. त्यामुळे महापालिकेत आतापर्यंत सुमारे वीस ते पंचवीस हजार कागदपत्रे असून, ते स्कॅनिंग करावे लागणार आहे. 
 
Web Title: marathi news jalgaon muncipal corporation digital record