महापालिका निवडणुकीत सकाळ सत्रात अल्प प्रतिसाद 

महापालिका निवडणुकीत सकाळ सत्रात अल्प प्रतिसाद 

जळगाव ः महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2018 साठी आज मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. महापालिकेच्या 19 प्रभागांत होत असलेल्या मतदान प्रक्रियेला सकाळच्या सत्रात अल्प प्रतिसाद मिळाला असून, सकाळी अकरा वाजेपर्यंत शहरातून केवळ साडेपाच टक्‍केच मतदान झाले आहे. 
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (ता.1) मतदान होत असून 19 प्रभागांमधील 75 जागांसाठी 303 उमेदवार भवितव्य आजमवत आहेत. तिरंगी, बहुरंगी लढती बऱ्याच प्रभागात होत असून, भाजप-शिवसेना यांच्यातील लढतीचे रंग निवडणूक केंद्रावर उभ्या असलेल्या उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांवरून पाहण्यास मिळत होते. मतदान प्रक्रियेला सकाळी साडेसात वाजेपासून सुरवात झाली. शहरातील 19 प्रभागांमध्ये झालेल्या प्रक्रियेत मतदानात सकाळी सकाळ अकरा वाजेपर्यंत केवळ साडेपाच टक्‍के मतदान झाले आहे. यामध्ये 11 हजार 454 पुरूष व 7 हजार 95 महिला अशा एकूण 18 हजार 549 जणांनी मतदान केले होते. 

उमेदवारांच्या केंद्रावर फिरस्ती 
सकाळी मतदानाचा प्रक्रिया सुरू झाल्यापासून रिंगणात असलेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते केंद्राच्या बाहेर उभे होते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलिस बंदोबस्त होता. संवेदनशिल केंद्रावर कार्यकर्ते आणि मतदारांची देखील गर्दी अधिक असल्याचे पाहण्यास मिळाले. सकाळी नऊ वाजेनंतर उमेदवार देखील बाहेर पडून प्रत्येक केंद्रावर जावून चाचपणी करत होते. परंतू, हुडको परिसरातील केंद्रावर उमेदवार वारंवार येत असल्याने पोलिसांकडून उमेदवारांला देखील हटकले. वारंवार केंद्रावर न येता दोन तासांनी येण्याचे पोलिसांनी उमेदवारास सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com