नव्या घंटागाड्या धावण्याला मुहूर्त सापडेल? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

जळगाव ः शहरातील दैनंदिन स्वच्छतेचा एकमुस्त मक्ता महापालिकेकडून "वॉटरग्रेस' या एजन्सीला देण्यात आला आहे. कचरा संकलनाच्या प्रत्येक वाहनाला "जीपीएस'प्रणाली लावली जाणार आहे. कचरा संकलनासाठी महापालिकेने खरेदी केलेली 85 वाहने (घंटागाड्या) लवकरच रस्त्यावर धावतील, असे सांगितले जात असले, तरी गेल्या चार महिन्यांपासून पडून सडत असलेल्या या वाहनांना कधी मुहूर्त सापडेल? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

जळगाव शहराच्या संपूर्ण स्वच्छतेसाठी एकमुस्त पद्धतीने मक्ता देण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली. त्यानुसार आता "वॉटरग्रेस' या एजन्सीला पाच वर्षांसाठी 75 कोटींचा संपूर्ण जळगाव शहरातील रस्ते व गटारींची स्वच्छता तसेच प्रत्येक घरातील ओला व सुका कचरा संकलनाचा मक्त दिला आहे. त्यास महासभेने मंजुरीही दिली आहे. त्यानुसार आता प्रशासनाने मक्तेदाराला वर्कआर्डर देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन 15 जुलैनंतर प्रत्यक्षात स्वच्छतेच्या कामाला मक्तेदाराकडून सुरवात होणे शक्‍य आहे. 

चार महिने घंटागाड्या धूळखात 
शासनाच्या "जीएम पोर्टल'वरून घंटागाड्या खरेदी करून चार महिने उलटूनही ही वाहने महापालिका इमारतीच्या पार्किंगमध्ये धूळखात पडून होत्या. वाहने खरेदी करूनही त्यांचा उपयोग का केला जात नाही, याबाबत महापालिकेत येणाऱ्याला प्रत्येकाला प्रश्‍न पडत होता. परंतु एकमुस्त स्वच्छतेच्या निविदा प्रक्रियेस उशीर झाल्याने तसेच वाहनांवर नंबर, "आरटीओ'कडून पासिंग करणे आदी कामांमुळे चार महिने उशीर झाला. 

देखभालीची जबाबदारी मक्तेदाराची 
मक्तेदारास महापालिका प्रशासन 100 घंटागाड्या, 12 कचराकुंड्या उचलणारे काम्पाक्‍टर व 6 डंपर वापरण्यासाठी देणार आहे. या वाहनांवर कर्मचारी नेमणे, वाहनांची देखभाल-दुरुस्ती, इंधनखर्च मक्तेदाराला 
करावा लागणार आहे. पाच वर्षे ही वाहने मक्तेदाराच्या ताब्यात राहतील. झोपडपट्टी परिसरात कचरा संकलनासाठी मक्तेदाराला हातगाड्यांचीही सुविधा द्यावी लागेल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon muncipal corporation ghanta gadi