महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध

bharti sonawane
bharti sonawane

जळगाव : महापौरपदासाठी भाजपच्या भारती सोनवणेंना सर्वपक्षीय पाठिंबा मिळला असल्याने त्यांची बिनवीरोध निवड निश्‍चीत माणली जात होती. त्यानुसार आज झालेल्या महापौर निवडीच्या सभेत त्यांना पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी बिनवीरोध निवड म्हणून घोषीत केले. 

जळगाव महापालिकेची 2018 ला सार्वत्रिक निवडणूक झाली होती. यात भाजपने 57 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले होते. भाजपच्या धोरणानुसार सव्वा वर्षाचा कार्यकाळ सीमा भोळे यांचा पूर्ण झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयाकडून महापौर निवडीची कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. भाजपचे नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी महापौर पदासाठी नगरसेविका भारती सोनवणे यांची उमेदवारी निश्‍चित केली. त्यानुसार भारती सोनवणे यांनी भाजपकडून अर्ज भरला होता. त्यांना सर्वपक्षीय पांठीबा मिळाला होता. पाठिसान अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता निवडीची सभा घेण्यात आली. एकमेव अर्ज असल्याने त्यांची घोषणा करण्यात आली. यावेळी भाजपचे सर्वपदाधिकारी उपस्थित होते. 

शुभेच्छांचा वर्षाव 
महापौरपदी निवड झाल्यावर भाजपच्या पदाधिकारी व सर्वपक्षीय नगरसेवकांनी नवनिर्वाचीत महापौर भारती सोनवणे यांना शुभेच्छा देण्याची गर्दी केली होती. तसेच फटाके व ढोलताशे लावून महापालिकेच्या इमारती बाहेर जल्लोष करण्यात आला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com