वॉटर ग्रेस कंपनी स्वच्छतेचा ठेका 48 तासात बंद करणार 

jalgaon mahapalika
jalgaon mahapalika

जळगाव : महापालिका प्रशासनाने मक्ता रद्द का करण्यात येऊ नये अशा आशयाची मक्तेदाराला अंतिम नोटीस बजावली होती. त्यावर मक्तेदाराने खुलासा देखील दिला होता. परंतु आता मक्तेदाराने महापालिका प्रशासनाने 2 कोटी 26 लाखांचा लावलेला दंड हा बेकायदेशीर असल्याचे कारण देत 48 तासात काम बंद करण्याची नोटीस वॉटरग्रेस कंपनीने सी. के. लीगल ऍडव्होकेट ऍण्ड कन्सलटन्टच्या माध्यमातून देवून संकेत दिले आहे. महापालिका प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे. 
महापालिकेने दैनंदिन साफसफाईचा वॉटरग्रेस कंपनीला पाच वर्षासाठी 75 कोटींचा एकमुस्त मक्ता दिला आहे. ऑगस्ट महिन्यापासून मक्तेदाराच्या माध्यमातून साफसफाई आणि कचरा संकलनाचे काम सुरू आहे. मात्र कचरा संकलन, साफसफाई व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी वारंवार होत असे. तसेच महापालिकेने प्रशासनाने वारंवार मक्तेदाराला नोटिसा दिल्या. तरीही कामकाजात सुधारणा होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. तसेच नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त करत साफसफाईचा एकमुस्त मक्ता रद्द करावा अशी मागणी केली होती. त्यामुळे प्रशासनाने मक्तेदाराला मक्ता रद्द का करण्यात येऊ नये अशा आशयाची अंतिम नोटीस बजावून सात दिवसात खुलासा मागविला होता. मक्तेदाराने महापालिकेला खुलासा सादर केला होता. मात्र आता मक्तेदारानेच 48 तासात काम बंद करण्याचे संकेत दिले आहे. 

प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था 
वॉटरग्रेस कंपनीच्या कामावर प्रशासनासह पदाधिकारी व नगरसेवक समाधानी नसल्यामुळे प्रशासनाने मक्ता रद्द का करण्यात येऊ नये अशा आशयाची नोटीस बजावली होती. त्यानंतर पर्यायी व्यवस्था म्हणून प्रभाग समिती 2, 3 व 4 साठी वेगवेगळे साफसफाईचा मक्ता देण्यासाठी निविदा काढली असून 28 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. प्रभाग समिती क्रमांक 1 मधील प्रभागांमध्ये मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचारी, तर प्रभाग समिती क्रमांक 2, 3 व 4 मध्ये नवीन वेगवेगळ्या तीन मक्तेदारांच्या 400 कामगारांच्या माध्यमातून साफसफाईसाठीची प्रक्रिया सुरू आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com