मनपा सभांमधील चहा, नाष्ट्याच्या बिलात गैरव्यवहार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

जळगाव : महापालिकेतील "स्थायी' व महासभांमध्ये सदस्यांना चहा व नाष्टा दिला जातो. या चहा, नाष्टा पुरविण्याच्या बिलांमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार पुरवठादाराने महापौरांकडे केली आहे. यात 2013 ते 2018 दरम्यानची सुमारे एक लाख रुपयांची बिले गायब असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत महापौर भारती सोनवणे यांनी लेखा विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. 

क्‍लिक करा -  "मनपा'त पदाची "भाकरी' फिरविली, कामेही व्हावी! 

महापालिकेत होणाऱ्या विविध सभांमध्ये चहा व नाष्टा दिला जातो. हा चहा, नाष्टा पुरवठादार सुरेश दयाराम पाटील यांच्याकडून अनेक वर्षांपासून पुरविला जात आहे. पुरवठ्यानुसार ती बिले संबंधित विभागाला देतात. मात्र, पाटील यांचे बॅंकेत खाते नसल्याने ज्या विभागाकडून हा नाष्टा व चहा मागविला जातो. त्यानंतर संबंधित विभागाकडून लेखा विभागातून बिले मंजूर केल्यानंतर रोख स्वरूपात बिलाचे पैसै पुरवठादार पाटील यांना मिळतात. 

बिलांची रक्कम मिळाली नाही 
पुरवठादार पाटील यांना सध्या सभांना नाष्टा पुरविल्यावर नियमित बिलानुसार पैसे मिळतात. मात्र, 2013 ते 18 मध्ये तत्कालीन नगरसचिव निरंजन सपकाळे, सुभाष मराठे यांच्या काळातील बिलांची रक्कम त्यांना आजपर्यंत मिळाली नसल्याची तक्रार पाटील यांनी महापौर भारती सोनवणेंकडे केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ. चंद्रशेखर पाटील उपस्थित होते. 

चौकशीचे दिले आदेश 
तक्रार करताना पाटील यांनी या बिलांची रक्कम वित्त विभागातून परहस्ते तर काढली गेली नाही, असा संशय महापौरांकडे व्यक्त केला. नगरसेवकांनी लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांना दालनात बोलावून त्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

पोलिसात तक्रार करा 
गरीब चहा विक्रेत्यांची बिले इतके वर्षे का थकविली, असा जाब नगरसेवक कैलास सोनवणे यांनी यावेळी लेखा विभागातील अधिकाऱ्यांना विचारला. ही बिले जर विभागातून कुणी परस्पर काढून पाटील यांना दिली नसतील तर तर संबंधितांच्या विरोधात पोलिसात तक्रार करा, असेही सोनवणे यांनी सांगितले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon muncipal corporation sabha tea breckfast bill froad