सुरेशदादा जैन चालतात मग भोळे का नको? 

सुरेशदादा जैन चालतात मग भोळे का नको? 

जळगाव : महापालिकेवर खानदेश विकास आघाडीची सत्ता असताना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा हस्तक्षेप चालत होता. मग आता भाजपची सत्ता असताना आमदार सुरेश भोळे शहराच्या विकासाबाबत मार्गदर्शन करीत असतील तर ते का चालत नाही? असा सवाल भाजपकडून विचारण्यात आला आहे. तर शिवसेनेने त्याला आक्षेप घेत सुरेशदादा जैन केव्हा महासभेत पास घेऊन आले होते याचा पुरावा द्यावा, असे उत्तर दिले आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हे "वॉर' जोरात सुरू आहे. 
महापालिकेवर भाजपची सत्ता असून, महापौरपदी आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांनी निवड झाली आहे. पहिल्या महासभेचे कामकाज पाहण्यासाठी आमदार भोळे प्रेक्षकांमध्ये बसले होते. तसेच यापूर्वी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेत मार्गदर्शनही केले होते. त्याला आक्षेप घेत शिवसेनेने त्यांना स्वीकृत नगरसेवकपदाची "ऑफर' दिली आहे. 

भाजपचे उत्तर 
शिवसेनेच्या या आव्हानाला भाजपचे माजी नगरसेवक उदय भालेराव यांनी सोशल मीडियावर उत्तर देत म्हटले आहे की, तुमचे नेते सुरेशदादा जैन आमदार असताना महापालिकेत लक्ष घालत होतेच की...! आमदार असतानाही तुमच्या नेत्यांना नगरसेवक होण्याचा मोह आवरला नव्हता. ही शिवसेनेची मंडळी सोईस्कररीत्या विसरलेली दिसत आहे. आमदार भोळे हे शहर विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत. शहरातील पाणी, रस्ते, आरोग्य यांची मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून सुविधा मिळतात की नाही, हे पाहणेही आमदार भोळे यांचे काम आहे. 

शिवसेनेचे प्रत्युत्तर 
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजपला उत्तर दिले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे, आम्ही भालेराव यांच्या वक्तव्याचे स्वागत करतो, सुरेशदादा जैन यांनी पास काढून महासभेत बसल्याचा पुरावा द्यावा. 1980 ते 2009 पर्यंत सुरेशदादा जैन चाळीस वर्षे आमदार होते, त्यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास व शहर विकास आघाडीची सत्ता होती, दोन्ही आघाडीच्या नगरसेवकांचा जैन यांच्यावर विश्‍वास होता. सर्वसाधारण व विशेष सभा असली तर जैन यांच्या निवासस्थानी बैठका होत असत. ते कधीही दुसऱ्याच्या घरी, सरकारी बंगला, महापालिका सभागृहात कधीही बैठका घेत नसत. जैन यांचे निष्ठावंत पदाधिकारी काम करून घेण्यास सक्षम होते. त्यांच्या जैन यांचा विश्‍वास होता. त्यांचे बंधू रमेश जैन महापौर असतानाही सुरेशदादा जैन पास काढून सभागृहात किंवा मनपात आले नाहीत. असे अनेक मुद्दे शिवसेनेच्या नगरसेवकांतर्फे सोशल मीडियावर देण्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com