थकबाकीदार मालमत्तांचा होणार लिलाव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

जळगाव : शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी आहे. यात बड्या थकबाकीदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. उपायुक्‍त डॉ. उत्कर्ष गुटे यांनी याबाबत आढावा घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना वसुली मोहीम तीव्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव लवकरच केला जाणार आहे. 

महापालिकेवर असलेल्या "हुडको'च्या कर्जामुळे आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. "हुडको'ला दरमहा 3 कोटी रुपये कर्जापोटी द्यावे लागत आहे. त्यात महापालिकेचे उत्पन्न अल्प असून, अनेक मालमत्ताधारकांवर कोट्यवधी रुपये थकीत आहेत. त्यामुळे शहरातील मूलभूत सुविधांसह विकासकामे, तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी देखील महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाकडून वसुलीवर भर देण्यात येत असून, उत्पन्नाच्या बाजूदेखील वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे शहरातील बड्या थकबाकीदारांची यादी महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात येत असून, या यादीमधील एक लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याच्या तयारी महापालिका प्रशासन करत आहे. तसेच मालमत्ताकराच्या वसुलीबाबत देखील नियोजन केले जात असल्याची माहिती उपायुक्तांनी दिली. 

मनपा सभागृहात होणार लिलाव 
प्रत्येक प्रभागातील एक लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर कारवाई होणार आहे. त्यांच्या मालमत्तांचा जाहीर लिलाव महापालिकेच्या सभागृहात केला जाईल. इच्छुकांकडून त्यासाठी बोली लावली जाईल. ज्या ठिकाणी कोणी इच्छुक नसेल त्या ठिकाणी एक रुपये शुल्क भरून महापालिका स्वत: ती मालमत्ता खरेदी करणार आहे. चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या क्षेत्रातील 50 ते 60 मालमत्ताधारकांवर आधी ही कारवाई होणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon muncipal corporation tax panding lilav