महापालिकेत लवकरच रिक्‍त पदांसाठी भरती 

महापालिकेत लवकरच रिक्‍त पदांसाठी भरती 

जळगाव ः जळगाव शहर महानगरपालिकेतील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून या पदांची भरती करणे तसेच आकृतिबंध संदर्भात शासनाने अतिरिक्त माहिती मागवली आहे. लवकरात लवकर आकृती बंध मंजूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून आता महापालिकेकडून शासनाने रिक्त पदे, मंजूर पदे आणि आवश्‍यक पदांची अतिरिक्त माहिती मागवली आहे. 

महापालिकेच्या भरती प्रक्रियेकरिता पाठविण्यात आलेला आकृतिबंधात त्रुटी शासनाने काढल्या आहेत. या त्रृट्या दुरुस्त करून अतिरिक्त माहिती शासनाने महापालिकेकडे मागितली आहे. सन 2000 पासून आकृती बंध मंजूर झालेला नसल्यामुळे नगरपालिका किंवा महापालिकेत भरती झालेली नसल्याने पदोन्नत्या व आकृती बंधमुळे ब्रेक लागला आहे. यामुळे मनपाच्या कामकाजावर परिणाम होत असून महापालिकेत 850 अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे गेली अनेक वर्षापासून रिक्त आहेत. रिक्‍तपदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडून कामकाजावर परिणाम होत आहे. 

आकृतिबंध मंजूर नसल्याने भरती नाही 
सन 2005 ते 6 पासून रिक्त झालेल्या पदावर बढत्या झालेल्या नाहीत, कालबाह्य पदोन्नोत्यांचा प्रस्तावदेखील प्रलंबित आहे. आकृतिबंधाला मंजुरी मिळत नसल्यामुळे नवीन भरती होऊ शकली नाही, परिणामी महापालिकेच्या जवळपास सर्वच विभागातील अधीक्षक प्रभारी असून त्यांना दोन, तीन पदभार सांभाळावे लागत आहे. 

आकृतिबंधातील त्रुटी दूर काढण्याला वेग 
महापालिकेने आकृतिबंध तयार केला होता. स्थायी समिती आणि महासभेची मंजुरी घेऊन अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. परंतु लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रशासनाकडून पाठपुरावा न झाल्यामुळे हा प्रस्ताव शासनस्तरावर पडून होता. आता हा आकृतिबंध मंजुरीसाठी हालचाली गतिमान झाल्या असून शासनाने या आकृतिबंधात काही त्रुटी काढल्या आहेत. तसेच काही अतिरिक्त माहिती देखील शासनाकडून मागविण्यात आली असून प्रशासनाकडून माहिती सादर केली जाणार आहे. 

जकातची पदे होणार कमी 
जळगाव शहर महानगरपालिकेत 2 हजार 674 कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहे. यापैकी सध्या 1 हजार 821 कर्मचारी कार्यरत आहे. त्यामुळे एकूण 853 पदे सध्यापरिस्थितीत रिक्त आहे. यात 138 जकात कर्मचाऱ्यांची पदे कमी करण्यात येत असून काही वेगवेगळ्या विभागातील पदांची संख्या वाढविण्यात येणार आहे. 

महत्त्वाची पदे रिक्त 
महापालिकेत विविध विभाग अधीक्षकांच्या 10 पदापैंकी 8 अधीक्षक कार्यरत आहेत. तर 8 अधीक्षक पदांवर प्रभारी आहेत. मोठ्याप्रमाणावर डॉक्‍टर, परिचारक, मिश्रकांची पदे रिक्त आहेत. अनेक संवैधानिक पदे रिक्त असून सचिव, लेखाधिकारी, आंतर लेखा परीक्षक, प्रमुख लेखापाल, उपलेखापाल व विविध विभागातील अभियंत्यांची पदे देखील अनेक वर्षापासून रिक्त आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com