esakal | सगळ्यांचे चांगले होईल, माझा आर्शिवाद आहे  कोरोनामुक्त महिलेच्या भावना ः

बोलून बातमी शोधा

jalgaon mungse corona patint cure .

जिल्ह्यातील कोरोनाचा दुसरा रुग्ण कोरोनामुक्त झाला याचे समाधान आहे. नागरिकांनी कोरोनाला घाबरू नये, पण काळजी घ्यावी. आमच्याकडे उपचार घेत असलेले रुग्ण लवकरच बरे होऊन त्यांना सुखरूप घरी पाठविण्यात आम्हाला यश येईल. 
डॉ. भास्कर खैरे, अधिष्ठाता, 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 

सगळ्यांचे चांगले होईल, माझा आर्शिवाद आहे  कोरोनामुक्त महिलेच्या भावना ः
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव  "माझ्यावर उपचार करणाऱ्या सगळ्यांचे चांगले होईल', अशा शब्दात कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण महिलेने आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंगसे (ता. अमळनेर) येथील 60 वर्षीय महिलेचे 14 दिवसांच्या उपचाराअंती शेवटचे दोनही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना आज घरी पाठविण्यात आले. कोरोनावर मात करणाऱ्या त्या जिल्ह्यातील दुसऱ्या तर पहिल्याच महिला रुग्ण ठरल्या आहेत. 

हेही वाचा ःभुसावळ मध्ये पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह 

मुंगसे (ता.अमळनेर) येथील महिला कोरोना बाधित आढळून आली होती. या महिला रुग्णाचा दुसरा व तिसरा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना आज टाळ्यांच्या गजरात घरी पाठविण्यात आले. रुग्णालयातून जाताना ही महिला भावनाविवश झाली होती. तिच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत होता. 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील, डॉ. विजय गायकवाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. 

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढत असताना जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील पहिला रुग्ण तिही महिला आज कोरोनामुक्त होऊन घरी जाणार असल्याने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड 19 रुग्णालय परिसरात सकाळपासून उत्साहाचे वातावरण होते. विशेषत: परिचारिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. गेले चौदा दिवस त्यांनी धैर्यपूर्वक केलेल्या उपचारामुळे जिल्ह्यातील दुसरा व पहिलीच महिला रुग्ण बरी होऊन घरी जाणार होती. डॉ. खैरे आणि त्यांच्या टीमने 14 दिवस या रुग्णांवर उत्तमरीतीने उपचार केले. या महिला रुग्णांस उत्साहात व टाळ्यांच्या गजरात निरोप देण्यात आला. 
ती महिला म्हणाली, "बठ्ठा, डॉक्‍टर मना मायबाप, भाऊ शेतस'. सगळ्यांचे चांगले होईल असा माझा आशीर्वाद आहे. आणि रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम सार्थकी लागले. एका रुग्णवाहिकेतून मुंगसे येथे त्यांच्या घरी पाठविण्यात आले. 

कोरोना संसर्ग वॉर्डात पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन शिफ्टमध्ये डॉक्‍टर, पारिचारिका असा एकूण 36 जणांचा स्टॉप अहारोत्र कार्यरत होता. डॉ. मिलिंद पवार, डॉ. मारुती पोटे, डॉ. दत्तात्रय बिराजदार, विजय पंचलवार, सुयोग चौधरी, अमित भंगाळे, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी रुग्णांची सेवा केली. 

नक्की वाचा ः दारुड्यांचा गर्दीवर आता अर्जांचा उतारा 

वैद्यकीय महाविद्यालय नव्यानेच सुरू झाले त्यातच हा आजार नवीन असल्याने सुरवातीस भीती होती. रुग्णांना धीर देण्यावर भर दिला. हे एक टीमवर्क आहे. रुग्ण बरे होत असल्याचे समाधान आहेच. रुग्णांना आम्ही बरे करू असा विश्वास निर्माण झाला आहे. 

डॉ. विजय गायकवाड, 
उपचार करणारे डॉक्‍टर