जळगाव पालिकेसाठी अखेर तिरंगी लढत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

जळगाव : अखेरच्या क्षणापर्यंत भाजप-शिवसेनेने युतीची हवा गरम ठेवली. पण, महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी या दोन्ही पक्षांनी सर्व जागांवर उमेदवार देत युतीबाबत हात वर केले आहेत. शिवाय कॉंग्रेस-राष्ट्रवादी-समाजवादी पक्ष या आघाडीनेही सर्व उमेदवार दिल्याने प्रमुख पक्षांमधील तिरंगी लढत निश्‍चित झाली आहे. आज अखेरच्या दिवसापर्यंत 75 जागांसाठी 618 अर्ज दाखल झाले असून, 18 तारखेला माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

जळगाव महापालिकेची रणधुमाळी आजपासून खऱ्या अर्थाने सुरू झाली. अर्ज दाखल करण्यासाठी आज अंतिम दिवस असल्याने उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी पालिका इमारतीत अक्षरशः झुंबड उडाली होती. भाजप, शिवसेना यांनी प्रत्येकी 75 उमेदवारांची यादी जाहीर करत त्यांचे अर्जही दाखल केले; तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी- समाजवादी पक्ष या आघाडीच्या वतीनेही सर्व 75 जागांवर उमेदवार देण्यात आले. इतर पक्ष व अपक्ष म्हणूनही उमेदवार मोठ्या प्रमाणात या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. 
 
संभाव्य प्रमुख उमेदवार 
अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये भाजपकडून मावळते महापौर ललित कोल्हे, सिंधूताई कोल्हे, डॉ. आश्‍विन सोनवणे, सुनील माळी, सदाशिव ढेकळे, अशोक लाडवंजारी, शिवसेनेकडून माजी महापौरांमधून नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, राखीबाई सोनवणे याशिवाय नितीन बरडे, सुनील महाजन यांनी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीकडून अश्‍विनी विनोद देशमुख, मंगला भरत पाटील, मुविकोराज कोल्हे, दीपाली दुर्गेश पाटील यांनी, तर कॉंग्रेसकडून सय्यद फारुख सय्यद गफ्फार यांनी उमेदवारी दाखल केली आहे. 

पक्षनिहाय उमेदवार संख्या 
भाजप : 75 
शिवसेना : 75 
राष्ट्रवादी : 55 
कॉंग्रेस : 17 
समाजवादी पक्ष : 03 
अन्य ः 393 

Web Title: marathi news jalgaon municipal corporation