मनपाची धडक कारवाई...दाणाबाजारातील सहा दुकाने केले सिल ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 एप्रिल 2020

अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली अनेक दुकानांवर कोणतीही "फिजिकल डिस्टन्सिंग' पाळली जात नसल्याचे दिसून येत आहे.

जळगाव ः "कोरोना विषाणू'चा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या दुकानांवर "फिजिकल डिस्टन्सिंग' पाळली जात नसल्याचे दिसत आहे. महापालिकेचे अतिरिक्त उपायुक्त संतोश वाहुळे यांनी आज सकाळी शहरातील दाणाबाजारात पाहणी केली असता धान्य दुकानांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. कोणतीही नियम पाळत नसल्याने त्यांनी सहा दुकाने सील करून नोटिसा दिल्या. 

आर्वजून पहा :  धक्कादायक ः मुल गाड झोपेत...तीने का ? उचलले असे पाऊल ! 
 

शहरात "कोरोना विषाणू'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग तसेच महापालिकेची यंत्रणा जीव मुठीत घेऊन काम करीत आहे. परंतु अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली अनेक दुकानांवर कोणतीही "फिजिकल डिस्टन्सिंग' पाळली जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यात आज सकाळी दाणाबाजारातील दुकानांवर अतिरिक्त उपायुक्त तथा मुख्य लेखापरिषक संतोष वाहुळे यांच्यासह महापालिकेच्या पथकाला दीड ते दोन हजार नागरिकांची गर्दी दिसून आली. यावेळी सर्व दुकानांचे व्हिडिओ काढून नियमांचे पालन न करणाऱ्या सहा दुकानांवर कारवाई करण्यात आली. यावेळी ही सहा दुकाने सील करून दुकानदारांना नोटीसा देण्यात आल्या. दुकानादारांना दिलेल्या मुदतीत नोटिशीवर खुलासा सादर करावा लागणार आहे. 

क्‍लिक कराः  दुर्दैवी घटना ः खेळत होता झोका...अन्‌ असे घडले भयंकर ! 
 

धान्य घेण्यासाठी गर्दी 
दाणाबाजारात अत्यावश्‍यक सेवेत येणाऱ्या किराणा दुकानादार तसेच नागरिक धान्य घेण्यासाठी मोठी गर्दी होती. परंतु "कोरोना'बाबत दुकानदार तसेच नागरिक कोणतीही काळजी घेत नसल्याचे यावेळी दिसून आले. अनेकांच्या तोंडाला रुमाल, मॉस्क नसल्याचे आढळून आले तर दुकानदार ग्राहकांना "फिजिकल डिस्टन्स'साठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे अढळून आले. 

एकवीस जणांवर दंडात्मक कारवाई 
महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तोंडाला मास्क व रुमाल लावलेले नसणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी 21 जणांकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारून सुमारे 10 हजार 500 रुपये दंड आकारला. महापालिकेच्या पथकात आरोग्य निरीक्षक सुधीर सोनवाल, रवींद्र निकम, गुरुदत्त ठाकरे, सुभाष कंडारे होते. 

ही दुकाने झाली "सील' 
दयासागर ट्रेडर्स, गुरू ट्रेडर्स, झंवर ऍण्ड सन्स, जयंत ट्रेडींग कंपनी, पगारिया ट्रेडिंग कंपनी, अडवाणी ट्रॅडर्स. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Municipal Corporation Physical Distinguishing Rules not falo six shop Seal