मंत्री महाजनांच्या दबावामुळेच नजन पाटलांची बदली : आमदार पाटील 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

जळगाव : पोलिस अधिकाऱ्याला कॉलर धरून दम देण्यापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांची जिल्ह्यात दहशत वाढली आहे. या प्रकरणी कारवाई करणारे चोपड्याचे पोलिस निरीक्षक नजन पाटील यांची बदली करण्यात आली. मंत्री गिरीश महाजन यांच्या दबावानेच ही बदली करण्यात आली असून जर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांवर अशी कारवाई होत असेल तर पोलिसांचा धाकच संपून जाईल. त्यामुळे शिवसेना याचा निषेध करीत असून पोलिस निरीक्षक नजन पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील. असे मत पाचोरा येथील शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

जळगाव येथील पद्‌मालय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, महापालिकेतील गटनेते सुनील महाजन, नगरसेवक विष्णू भंगाळे, किशोर भोसले आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, की चोपड्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या दहशतीला चाप लावण्यासह शहरात गुंडगिरी, अवैध धंदे रोखण्याचे काम पोलिस निरीक्षक नजन पाटील यांनी केले आहे. पोलिस अधीक्षकांनी त्यांचे कौतुक करण्याची गरज असताना उलट त्यांचीच बदली करण्यात आली. मंत्री गिरीश महाजन यांच्या दबावामुळेच त्यांनी ही कारवाई केली आहे. मात्र यामुळे गुंडगिरी वाढेल आणि पोलिसांचे कारवाईचे बळ संपणार आहे. शिवसेना या बदलीचा निषेध करीत असून राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन त्यांना या प्रकारात लक्ष घालण्यास सांगण्यात येणार आहे. शिवसेना या प्रकरणाचा पूर्ण पाठपुरावा करणार असून नजन पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी ज्या लोकांवर कारवाई केली. त्यांना आजाराच्या नावाखाली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात जिल्हा कारागृहाचा जेलरबाबतही आपल्याला प्रश्‍नचिन्ह वाटत आहे. त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्याची गरज असल्याचे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले.

Web Title: marathi news jalgaon najan patil transfer girish mahajan Mla Patil