जळगाव जिल्ह्यात नवीन सात कोरोना बाधित; एकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 मे 2020

कोरोना व्हायरसचा प्रुादर्भात वाढत असून, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोनाग्रस्तांमध्ये आणखी सात रूग्णांची भर पडली आहे.

जळगाव ः येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 76 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल नुकताच प्राप्त झाला. यापैकी 68 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले, एका व्यक्तीचा अहवाल रिजेक्‍ट करण्यात आला आहेत. तर सात व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

कोरोना व्हायरसचा प्रुादर्भात वाढत असून, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. या कोरोनाग्रस्तांमध्ये आणखी सात रूग्णांची भर पडली आहे. या सात व्यक्तीमध्ये एक 40 वर्षीय पुरूष हा अजिंठा चौफुली (जळगाव) येथील आहे. तर एक 65 वर्षीय पुरूष हा अडावद (ता. चोपडा), दोन व्यक्तीमध्ये 24 वर्षीय महिला व 30 वर्षीय पुरूष हे पाचोरा येथील आणि अमळनेर येथील तीन व्यक्तीमध्ये 13 व 23 वर्षाचे तरूण व 16 वर्षीय तरूणीचा समावेश आहे. यापैकी जळगाव येथील तरूणाचा मृत्यू झाला आहे. 

जळगावने केली पन्नासी पार 
जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. एकवेळ जळगाव ग्रीनझोनमध्ये जाण्याची शक्‍यता वाटत असताना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. यामुळे अवघ्या दहा- बारा दिवसात कोरोना जळगाव जिल्ह्याने कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत पन्नासी पार केली आहे. आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 52 इतकी झाली आहे. त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon new sevan corona positive case detact