धान्य खरेदीचा आता नवा ट्रेंड... ऑनलाइन शॉपिंगने घरपोच धान्य !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मे 2020

"फिजिकल डिस्टन्स'मध्ये ग्राहकांची गर्दी होऊ नये, यासाठी आम्ही ग्राहकांना घरपोच धान्य देण्यासाठी ऑनलाइन धान्य पोच सेवा सुरू केली आहे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. आमच्यावरील विश्‍वासामुळे ग्राहक आमच्या वॉट्‌सऍप ग्रुपवर मालाची मागणी नोंदवितात. पेमेंटही ऑनलाइन करतात. 
 प्रवीण पगारिया 
अध्यक्ष, दाणाबाजार व्यापारी असोसिएशन 

जळगाव ः येथील दाणाबाजारात "लॉकडाउन'मुळे ग्राहकांची गर्दी होते आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आल्याने दाणाबाजारातील काही व्यापाऱ्यांनी ग्राहकांना ऑनलाइन धान्य खरेदीची सोय उपलब्ध करून नवा ट्रेंड आणला आहे. यामुळे दाणाबाजारात ग्राहकांची गर्दी कमी होण्यास मदत होत आहे. 

नक्की वाचा : रस्त्यावरील बेशिस्त फळ-भाजी बाजार होणार बंद ! 

अत्यावश्‍यक सेवा म्हणून दाणाबाजारातील धान्य विक्रीची दुकाने सुरू आहे. प्रशासनाने "फिजिकल डिस्टन्स'चे पालन करीत दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तर ग्राहक गर्दी करीत आहे. दुकानदारांनी खास व्यक्तींची नियुक्ती करीत "फिजिकल डिस्टन्स'चे पालन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

स्वतःचा वॉट्‌सअप ग्रुप 
गर्दी टाळण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी स्वतःचा वॉट्‌सऍप ग्रुप तयार करून ग्राहकांना त्यावर धान्याचे विविध प्रकार, क्वालिटी, दर, वजन आदीबाबतचा एक कॅटलॉग त्यावर दिला आहे. कॅटलॉग पाहून संबंधित व्यापाऱ्यांचे ग्राहक मालाची पारख करतात. व्यापाऱ्यांवर विश्‍वास ठेवून मालाची ऑर्डर वॉट्‌सऍपवर ग्रुपवर देतात. ग्राहकांनी ऑर्डर दिली की लागलीच बिल तयार करून वॉट्‌सऍपवर पाठवितात. काही ग्राहक ऑनलाइन पेमेंट करतात. तर काही मालाची पोच घरी मिळाल्यानंतर पेमेंट करतात. व्यापारी चांगलाच माल देतील, या विश्‍वासावर ऑनलाइन धान्य खरेदीचे व्यवहार सुरू आहे. काही व्यापारी जळगाव जिल्ह्यासह नाशिक, अमरावती, पुणे आदी ठिकाणी माल पाठवीत आहेत. ऑनलाइन धान्य खरेदीस ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. 

आर्वजून पहा : भाजपचा फौजफाटा खडसेंना घेरण्याच्या तयारीत ! 
 

आमचे ग्राहक ऑनलाइन धान्याची मागणी नोंदवितात. त्यांना हव्या असलेल्या दर्जेदार मालाचीच आम्ही "डिलिव्हरी' देतो. यामुळे ग्राहक व आमच्यात एक नाते तयार झाले आहे. घरपोच धान्य पोचविण्याचा नवा ट्रेंड सुरू केल्याने ग्राहकांना समाधान आहे. 
 विजय वाणी, धान्य व्यापारी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon new teand by online grain shoping hoom delivery