esakal | जळगावात दहा कोरोना बाधित रूग्ण 

बोलून बातमी शोधा

corona positive

जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, भुसावळ, रावेर, जामनेर येथे स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे.

जळगावात दहा कोरोना बाधित रूग्ण 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांची संख्या पुन्हा वाढली असून, आज प्राप्त अहवालातील दहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. नवीन दहा पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णांमुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 124 वर पोहचली आहे. 

जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, भुसावळ, रावेर, जामनेर येथे स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 68 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दहा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 
पॉझिटिव्ह आढळलेले रूग्णांमध्ये भुसावळ येथील पाच, चोपडा येथील दोन, अमळनेर येथील एक तर मेहरूण व ममुराबाद (जळगाव) येथील दोन रूग्ण असे एकूण दहा रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 124 इतकी झाली असून त्यापैकी सोळा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे