जळगाव: कुरंगीत रानडुकराच्या हल्ल्यात दोन जण जखमी

राजेंद्र पाटील
शनिवार, 3 मार्च 2018

पुढील उपचारासाठी दोघांना जळगाव हलवण्यात आले आहे. वन विभागाचे अशोक ठोंबरे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या भागात मादी जातीच्या या रानडुकराने पिल्लांना जन्म दिलेला असावा.

नांद्रा ता. (पाचोरा) : कुरंगी ता.पाचोरा येथील चिंतामण तुकाराम कुंभार (वय ६५) यांच्यावर शेतात सकाळी ९ वाजेच्या सुमारास तर येथील पंढरीनाथ गोविंदा पाटील यांचा मुलगा सागर वय (२२) हा कांदा पिकाला पाणी देत असतांना दुपारी १२ च्या सुमारास रानडुकराने हल्ला केला.

पुढील उपचारासाठी दोघांना जळगाव हलवण्यात आले आहे. वन विभागाचे अशोक ठोंबरे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या भागात मादी जातीच्या या रानडुकराने पिल्लांना जन्म दिलेला असावा. या हल्यामुळे शेतकरी व मजुर वर्ग भयभीत झालेली आहेत. या पिसाळलेल्या रानडुकराचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Marathi news Jalgaon news boar attack people