खबरदार..! डीजे वाजवाल तर...; पोलिसांचा इशारा

दीपक कच्छवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : 'अवाज वाढव डीजे,' 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्याने ग्रामीण भागात धुम केली आहे. मात्र आता डीजेचा आवाज वाढविणे किंवा गणपती व दुर्गोत्सवाच्या मिरवणुकीत डीजे लावणाऱ्या मंडळाना चांगलेच महागात पडणार आहे. डीजे लावणाऱ्या मंडळांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मेहुणबारे पोलिसांनी मंडळाना व डीजे चालकांना नोटीसा बजावल्या आहेत.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : 'अवाज वाढव डीजे,' 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्याने ग्रामीण भागात धुम केली आहे. मात्र आता डीजेचा आवाज वाढविणे किंवा गणपती व दुर्गोत्सवाच्या मिरवणुकीत डीजे लावणाऱ्या मंडळाना चांगलेच महागात पडणार आहे. डीजे लावणाऱ्या मंडळांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मेहुणबारे पोलिसांनी मंडळाना व डीजे चालकांना नोटीसा बजावल्या आहेत.

मेहुणबारे पोलिस ठाण्याअंतर्गत 25 डीजे चालक असुन 44 अधिकृत गणेश मंडळे आहेत. या मंडळांच्या मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांनी गावोगावी जाऊन बैठका घेतल्या व आवश्यक सूचना दिल्या. तसेच मंडळांना माहीतीपत्र व नोटीस बजावण्यात आली आहे.

कोणताही सण-उत्सव या मंगल कार्यालयात मोठ्या प्रमाणात डीजेचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने  पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 ध्वनीप्रदुषन विनियमन व नियंत्रण नियमावली 2000 अन्वये डीजेवर बंदी घातली आहे. मात्र उत्सव काळात आदेशाची अवहेलना करत अनेक हौशी तरूण डीजेच्या तालावर धुम करताना सातत्याने दिसत. या महिन्यात सन उत्सवाला सुरवात होणार असून प्रथम गणेशाचे आगमन होणार असल्याने गणेश मंडळे कामाला लागले आहेत. गणेशाच्या मिरवणूकीत मंडळे डीजे लावुन आपली हौस पूर्ण करतात; काही तर मोठमोठे साउंड असलेले डीजे लावण्याच्या तयारीत आहेत.
 
पोलिसांनकडून खबरदारी 
मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप शिरसाठ यांचा डीजे वाजविण्यावर अंकुश लावण्याचे प्रयत्न आहेत. त्या दुष्टीकोणातुन नुकतीच मेहुणबारे पोलिस ठाण्याअंतर्गत श्री शिरसाठ यांनी गणेश मंडळाच्या बैठका घेऊन सुचना दिल्या. तसेच मिरवणुकी दरम्यान डीजे न लावण्याचे आव्हान केले आहे. या शिवाय नियमांचे पालन न कारणाऱ्या मंडळावर कारवाई करण्यात येईल व ध्वनिप्रदूषण करणारे साहित्य जप्त केले जाईल. असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे मात्र गणेश व दुर्गा मंडळातील हौशी तरूणांचा हिरमोड झाल्याचे दिसत आहे.

मेहुणबारे पोलिस ठाण्याअंतर्गत 52 गावे असुन यातील पंचवीस गावात डीजे चालक आहेत.या सर्वानी कायद्याचे पालन करून सण-उत्सव  शांततेत साजरा करावा. तसेच काही गावांत शांततेचा भंग होणार आहे यासाठी उपाय योजना करण्यात येणार असून डीजे चालकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.
- दिलीप शिरसाठ, साहाय्यक पोलिस निरीक्षक मेहुणबारे

Web Title: marathi news Jalgaon News Ganeshotsav DJ Sound Pollution