वरखेडे बिबट्या प्रकरण अधिवेशनात मांडणार

Gulabrao Patil
Gulabrao Patil

चाळीसगाव : वरखेडेत  होणाऱ्या  बिबट्याच्या हल्ल्यामुळे अख्या परिसर दहशतीत आहे. यंत्रणेने देखील काही कसूर ठेवलेला नाही लवकरच नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त होईल. त्यासाठी हवा तर खाजगी शूटर चा वापर करावा अशी सूचना केली आहे मात्र या पुढे अशा घटना होऊ नये, यासाठी प्रभावी नियोजन करण्यासाठी आधिवेशनात हा मुद्द्या मी लावून धरेल अशी माहिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

वरखेडे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या मयताच्या नातेवाईकांची भेट व प्रत्येकी अकरा हजाराची मदत देण्यासाठी ते आज या परिसरात आले होते. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभागृहात चाळीसगाव येथे दुपारी पत्रकारांशी वार्तालाप करतांना बोलत होते. यावेळी माजी आमदार आर. ओ. पाटील प्रांताधिकारी शरद पवार मुख्य उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी तहसीलदार कैलाश देवरे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते. 

मंत्री पुढे म्हणाले, की चाळीसगाव तालुक्यातील मोठा परिसर गौताळा अभयारण्य लागून आहे. या अभयारण्यात नऊ बिबटे व दोन पिल्ले असल्याची अधिकृत आकडेवारी आहे. आजपर्यंत हे बिबटे मानवी वस्तीकडे कधी आले नाही. मात्र हे बिबटे मानवी वस्ती कडे का येत आहे, याचा शोध घेणे, त्यांचा जंगल क्षेत्रात त्यांची अन्नसाखळी तुटली आहे का? तसेच या जंगल क्षेत्राशेजारी नवीन कंपन्यांचे कामे सूरु आहेत. त्यांच्या आवाजाने ते भयभीत झाले आहेत का? याचा ही शोध घेणे गरजेचे आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, की आज वनविभागाच्या प्रयत्नाचा आढावा घेतला त्या मध्ये आठ शार्प शूटर  चा अंतर्भाव असलेल्या आठ तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत आणि काही खाजगी शूटर यांचा ही वापर वनविभागाच्या मोहिमेत समावेश करावा अश्या सूचना दिल्याचे त्यानी सांगितले या भागातील बिबट्याच्या दहशतीमुळे जनजीवन ठप्प झाले असून या शेतात पिके उभी असतांना शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही यामुळे या शेतकऱ्यांना काही मदत करता येईल काय याबाबत शिवसेना प्रयत्नशील असल्याचे म्हणाले. एक दोन जीव गेल्यानंतर अशी युद्ध पातळीवर मोहीम राबविली असती तर अधिक बरे झाले असते अशी खंत त्यांनी व्यक्त केली. वीजवितरण कंपनीने  या भागातील वीजपुरवठा चोवीस तास सुरू ठेवावा अन्यथा त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असे त्यांनी कार्यकत्याना उद्देशून सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हाप्रमुख उमेश गुंजाळ तुकाराम कोळी, तालुका प्रमुख रमेश चव्हाण ,शहरप्रमुख शामलाल कुमावत यांची उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com