मुख्यमंत्री फडणवीस 30ला जळगाव जिल्ह्यात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 30 मार्चला जळगाव जिल्ह्यात येत असून त्यांच्याहस्ते दीपनगर येथील नव्या औष्णिक प्रकल्पासह जळगाव शहरात "अमृत' योजनेंतर्गत होणाऱ्या कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. 

जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 30 मार्चला जळगाव जिल्ह्यात येत असून त्यांच्याहस्ते दीपनगर येथील नव्या औष्णिक प्रकल्पासह जळगाव शहरात "अमृत' योजनेंतर्गत होणाऱ्या कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. 

जळगाव शहरासाठी "अमृत' योजनेंतर्गत 249 कोटींचा निधी मंजूर असून त्याअंतर्गत विविध कामांना मंजुरीही मिळाली आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया होऊन पाणीपुरवठा योजनेतील कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण होऊनही केवळ मुख्यमंत्र्यांची तारीख मिळत नसल्याने कामाला सुरवात होऊ शकली नव्हती. आता मुख्यमंत्र्यांनी 30 तारीख दिली आहे. या दौऱ्यात दीपनगर येथील नव्या औष्णिक प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येईल. त्यानंतर जळगावात "अमृत' योजनेचे भूमिपूजन व नंतर जैन इरिगेशन सिस्टिम्सच्या मसाल्याच्या उत्पादनांचे लॉन्चिंग त्यांच्याहस्ते होईल. 

असा आहे औष्णिक प्रकल्प 
दीपनगर येथील 660 मेगावॉट क्षमतेचा औष्णिक प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे साकारला जात आहे. 2011मध्येच या कामाला मंजुरी मिळाली होती, त्यानुसार या प्रकल्पाचे काम भारत हेवी इलेक्‍ट्रिकल लि. (भेल) या कंपनीला देण्यात आले. 5 हजार कोटींच्या या प्रकल्पाला अंतिम मंजुरी नव्हती, त्यामुळे काम रखडले. आमदार संजय सावकारेंनी पाठपुरावा केल्यानंतर या कामाचा मार्ग मोकळा झाला. सुपर क्रिटिकल तंत्रज्ञान वापरून प्रकल्प उभा राहत असून त्यातून प्रदूषण कमी होईल, कोळशाची 5 टक्के बचत होणार आहे.

Web Title: marathi news jalgaon news maharashtra CM devendra fadnavis