जळगाव: पिकअपची एसटीला धडक; बसचे नुकसान

दीपक कच्छवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

बसमध्ये केवळ पाच ते सहा प्रवासी होते. यातील कोणीही जखमी झाले नाही. या रस्त्यावर आठ दिवसात झालेला बसचा दुसरा अपघात आहे. या अपघात प्रकरणी बसचालक दिनकर दयाराम भिल (नंदुरबार आगार रा. जुणोने ता.जि.धुळे) यांनी मेहुणबारे पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पिकअप चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : चाळीसगाव-धुळे महामार्गावरील वडगावलांबे फाट्याजवळ धुळ्याकडुन भरधाव येणाऱ्या मालवाहू पिकअप गाडीच्या चालकाने बैलगाडी वाचविण्याच्या नादात चाळीसगाव-नंदुरबार बसला धडक दिल्याची घटना आज पहाटे घडली. यात बसचे मोठे नुकसान झाले आहे.
   
चाळीसगाव धुळे राज्य महामार्ग क्रमांक 211 वर आज पहाटे चाळीसगावकडुन नंदुरबारला जाण्यासाठी निघालेली बस क्रमांक Mh.20 बी.एल.2494  सकाळी सहाच्या सुमारास वडगावलांबे फाट्याजवळ आली असता, धुळेकडुन चाळीसगावकडे भरधाव वेगात जाणाऱ्या मालवाहू पिकअपच्या (क्रमांक Mh.04 DF.9566) चालकाने (नाव समजु शकले नाही) त्याच्यासमोर चालत असलेल्या बैलगाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात बसच्या चालकाच्या बाजुने गाडी नेण्याचा प्रयत्न केला. यात बसचे मोठे नुकसान झाले.

बसमध्ये केवळ पाच ते सहा प्रवासी होते. यातील कोणीही जखमी झाले नाही. या रस्त्यावर आठ दिवसात झालेला बसचा दुसरा अपघात आहे. या अपघात प्रकरणी बसचालक दिनकर दयाराम भिल (नंदुरबार आगार रा. जुणोने ता.जि.धुळे) यांनी मेहुणबारे पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पिकअप चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Marathi news Jalgaon news st bus accident