coronavirus : जळगावात आता...मंगलकार्यालय, लॉन्स, हॉटेल बंद ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

जळगाव : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून तसेच लग्नांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाभरातील मंगल कार्यालय, लॉन्स व हॉटेल्स यासह अन्य विवाह सभागृह (मॅरेज हॉल) बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज काढले असून पुढील निर्देश येईपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. या आदेशांची उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व यात्रा व उत्सव देखील रद्द करण्यात आले आहे. तसेच या यात्रा उत्सवांमध्ये राज्यभरातून नागरिक येत असतात. तसेच लग्नसमारंभासह इतर समारंभात वेगवेगळ्याठिकाणाहून नागरिक दाखल होत असतात. या सर्वांची पूर्व तपासणी करणे शक्‍य नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढणयाची शक्‍यता नाकारता येणार नाही. त्यामुळे जिल्ह्याभरातील सर्वमंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल यासह वास्तूंमधील विवाह सभागृह (मॅरेज हॉल) व विवाहस्थळावर होणारी गर्दी टाळणे गरजेचे आहे. यावर उपाययोजना म्हणून आज ता. 19 रोजी पासून हे सर्व ठिकाणेंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिले आहे. 

उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा 
जिल्हाधिकारी यांनी मंगल कार्यालये, लॉन्स बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर देखील पुढील निर्देश येईपर्यंत या आदेशाचे उल्लंघन करून गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश डॉ. ढाकणे यांनी दिले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Now on fire ... Mars office, lawns, hotel closed!