ऑनलाइन विदेशी कुत्रा घेण्यासाठी वकिलाला साडेपाच हजारांचा गंडा 

ऑनलाइन विदेशी कुत्रा घेण्यासाठी वकिलाला साडेपाच हजारांचा गंडा 

जळगाव : शहरातील एका वकिलाला सोशल मीडियाच्या आधारावर विदेशी कुत्र्याचे पिल्लू मिळवून देण्याचे आमिष देत भामट्याने साडेपाच हजारांत गंडविल्याचे उघडकीस आले आहे. रामानंदनगर पोलिसांनी संशयितास ठाणे येथून अटक केली आहे. आज न्यायालयात उभे केले असता त्याला न्यायालयीन कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे. 
शहरातील बळिरामपेठ येथील रहिवासी ऍड. केदार किशोर भुसारी कुटुंबासह राहतात. ऍड. केदार भुसारी यांना विदेशी जातीचे पाळीव कुत्रे पाहिजे होते. इंटरनेटच्या माध्यमातून शोध घेतला असता, त्यांना विजय दशरथ सिंग (रा. प्रिन्स प्लाझा, केबिन रोड, ठाणे) यांचा संपर्क क्रमांक मिळाला. यानंतर ट्विटर, व्हॉटसऍपसह सोशल मीडियाच्या माध्यमातून सिंग याने भुसारी यांचा विश्‍वास संपादन केला. 

कुत्र्याचे छायाचित्र पाठविले 
विजय सिंग याने भुसारी यांना पाहिजे असलेले विदेशी जातीचे कुत्रे मिळवून देण्याच्या आमिष दाखविले. त्यानुसार त्याने कुत्र्याच्या पिल्लाचे छायाचित्र भुसारी यांना पाठवून त्याच्या खरेदीची 5 हजार 500 रुपये किंमत सांगितली. भुसारी यांनी हे कुत्रं आवडल्याने त्यांनी हा कुत्रा घेण्यासाठी होकार दर्शविला. 

खातेक्रमांक दिला 
विजय सिंगने भुसारी जाळ्यात अडकल्याचे समजताच त्यांचा बॅंकेचा खातेक्रमांक पाठविला व यावर आधी पैसे पाठविण्यास सांगितले. ऍड. भुसारी यांनी 17 जानेवारी 2019 रोजी काव्यरत्नावली चौकातील एचडीएफसी बॅंकेतून सिंगने पाठविलेल्या खात्यावर पैसे टाकले. मात्र दीड महिनाच्या प्रतीक्षेनंतरही कुत्रा मिळाले नाही. 

पोलिस ठाण्यात तक्रार 
गेल्या दीड महिन्यापासून ऍड. भुसारी यांनी श्री. सिंग यांना वारंवार विचारणा केली असता त्यांनी आज पाठवितो, उद्या पाठवितो अशी उडवाउडवीचे उत्तरे दिली. यानंतर त्याचा क्रमांकही बंद झाला. श्री. सिंग यांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर 5 मार्चला ऍड. भुसारी यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

रामानंद पोलिस पोचले ठाण्याला 
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासधिकारी गोपाळ चौधरी यांनी तपासचक्रे फिरविली. मोबाईल लोकेशन, खाते क्रमांक अशा माहितीवरून संशयिताचा छडा लावला. तो ठाणे येथील असल्याचे निष्पन्न झाल्याने चौधरी यांनी गुन्हे शोध पथकातील प्रदीप चौधरी व रवींद्र पाटील या कर्मचाऱ्यांसह शनिवारी विजय सिंगला अटक केली. मध्यरात्री अडीच वाजता जळगावला पोचले. रविवारी सिंग यास न्यायालयात हजर केले असता, त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com