नऊ महिला उमेदवारांचे खुल्या गटात पुरुषांना आव्हान 

नऊ महिला उमेदवारांचे खुल्या गटात पुरुषांना आव्हान 

जळगाव : निवडणूक लढविण्यासाठी महिलांचा स्वतंत्र गट आहे. तरीही खुल्या गटातून उमेदवारी करून पुरुषांना नऊ महिलांनी आव्हान दिले आहे. यात राष्ट्रवादीच्या सर्वांत जास्त पाच उमेदवार आहेत. तर भाजप, बसपा आणि शिवसेना पुरस्कृत एक व एक अपक्ष आहे. 
महापालिका निवडणुकीत नवीन प्रभाग रचनेत सर्व प्रभाग मोठे झाले आहेत. एक प्रभागात साधारणत: 23 ते 24 हजार सरासरी मतदान आहे. त्यामुळे तब्बल 25 ते 30 किलोमीटरची पेरीफेरी आहे. अशा स्थिती महिला राखीव गटातून उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांची दमछाक होत आहे. परंतु काही महिला उमेदवार खुल्या गटातून उभ्या असून, त्या पुरुष उमेदवारांशी स्पर्धा करीत आहेत. विशेष म्हणजे यात पक्षीय उमेदवार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पाच महिला उमेदवार आहेत. तर भाजपतर्फे एक, बसपा एक तर शिवसेना पुरस्कृत एक असून, एक अपक्ष महिला उमेदवार आहे. 
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चार उमेदवार 
राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे चार महिला उमेदवार खुल्या गटात आहेत. भारती सिद्धार्थ मोरे (प्रभाग 2 अ), सायरा इस्माईल तडवी (11 अ), अश्‍विनी विनोद देशमुख (13 क), आशा शांताराम सूर्यवंशी (16 अ) मधून निवडणूक लढवीत आहेत. अश्‍विनी देशमुख या विद्यमान नगरसेविका आहेत. तर आशा शांताराम सूर्यवंशी माजी नगरसेविका आहेत. 
 
भाजपतर्फे एक उमेदवार 
भारतीय जनता पक्षातर्फे पार्वताबाई दामू भिल (11 अ) मधून निवडणूक लढवीत आहेत. त्याही विद्यमान नगरसेविका असून, गेल्या वेळी त्या मनसेतर्फे निवडून आल्या होत्या. 
 
जयश्री पाटील सेना पुरस्कृत 
जयश्री नितीन पाटील (8 ड)मधून निवडणूक लढवीत आहेत. त्या भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत. मात्र त्यांना पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. नंतर त्यांना शिवसेनेने पुरस्कृत केले आहे. 
 
बसपा व अपक्ष 
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्रात फारसे प्राबल्य नाही. परंतु महापालिका निवडणुकीत ललिता दिलीप सपकाळ (दहा "ड') या एकमेव पक्षाच्या उमेदवार असून, त्या खुल्या गटातून निवडणूक लढवीत आहेत. या शिवाय कल्पना जितेंद्र चव्हाण (सात "ड') खुल्या गटात अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com