कुंभारी बु येथील बोअरवेल ओहर प्लो

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

तोंडापूर (ता जामनेर) : तोंडापूरसह परिसरात गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे तोंडापूर धरण ओहर प्लो होवून नदी नाले तलाव ओसांडुन वाहत आहे. तर कुंभारी बु. येथे बोअरवेल हि ओहर प्लो होवून वाहत आहे 

कुंभारी बु. गावाच्या बाहेरील भागात पानलोट व्यवस्थापन समितीच्या मार्फत घेण्यात आलेल्या बोअरवेल दरवर्षी पावसाळ्यात जमिनीत पाण्याचा मुबलक साठा झाल्यावर पाणी ओहर प्लो होत असते. या वर्षी पावसामुळे हि बोअरवेल लवकरच ओहर प्लो झाली आहे. कुंभारी बु गावाने यावर्षी पाणी फाउंडेशनमध्ये सहभाग घेवून गावात शोषखड्डे तर गावाच्या आसपास व डोंगररांग भागात बांध व शेततळे खोदलेली आहे. त्यामुळे पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. गावाच्या बाहेर उंच ठिकाणी बोअरवेल तोंडापूर ते फर्दापुर या मुख्य मार्गावर असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी याना मोहित करत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon over flow boaring