पाल, बलवाडी येथील रेशन दुकानांचा परवाना रद्द

seal
seal

जळगाव : रेशन कार्ड धारकांना धान्याचा पुरवठा न करणे, धान्याचा काळाबाजार करणे, रेशन दुकानदारांची, नातेवाईकांची नावे अंत्योदय, प्राधान्य कुटूंब योजनेत घेणे, वाटप व शिल्लक साठ्यात तफावत आढळणे आदी कारणांवरून पाल व बलवाडी (ता.रावेर) येथील दोन रेशन दुकानांचा परवाना जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सूर्यवंशी यांनी आज रद्द केला आहे.


जिल्ह्यात रेशनाचा काळाबाजार चालतो, रेशन कार्ड धारकांना थम करण्याचा अधिकार दुकानदारांना दिल्याने कार्ड धारकांच्या नावाचे धान्य काळाबाजारात विकले जाते याबाबत सकाळने वारंवार वृत्त प्रसिध्दीस दिले. त्यामुळे पुरवठा अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये धान्याच काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.
पाल (ता.रावेर) येथील अय्यूब अकबर तडवी यांचे रेशन दुकान नंबर 23 आहे. या दुकानाबाबत अनेक लाभार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या. कार्डधारकांना धान्य वेळेत मिळत नाही, भावफलक लावलेला नसतो, दप्तर तपासणीसाठी मागतले असता मिळत नाही, धान्याचे वाटपाचे नियोजन नसते, केव्हाही धान्य वाटप होते, बंद होते, कार्ड धारकांना कार्डावरील नमूद संख्येपेक्षा कमी धान्य वाटप करणे, धान्याचा काळा बाजार करणे याकारणांवरून रावेर तहसिलदारांनी दिलेल्या अहवालावरून दुकान नंबर 23 चे प्राधिकारपत्र तीन महिन्यासाठी रद्द करण्यात आले आहे.

बलवाडी महिला बचत गट
बलवाडी (ता.रावेर) येथील प्रियदर्शनी महिला बचत गटाचे रेशन दुकान आहे. या दुकानाबाबतही कार्डधारकांच्या तक्रारी होत्या. लाभार्थ्यांना धान्य वाटप शिल्लक असताना धान्याचा साठा आढळून आला नाही. तांदूळ वाटप न होता तांदूळ शिल्लक नाही, महिला बचत गटाच्या काही सदस्यांची नावे, कुटूंबातील सदस्यांची नावे प्राधान्य यादीत, अंत्योदय यादीत टाकून घेतलेली आहे. 1136 युनिटचा साठा आवश्यक असताना 1 हजार युनिटचा धान्य साठा आहे. 136 युनिटचा साठ्याचा हिशोबच नाही, कार्ड धारकांचा धान्य नसल्याचे सांगून मानसिक छळ करणे, बचत गटाची सदस्या आशाबाई तायडे एमएसईबी नोकरीला आहे त्याचे नाव पांढऱ्या कार्डात आहे, मात्र त्याच्या मुलाचे नाव आशाबाई तायडेच्या शिधापत्रीकेत आहे, वाटपाचा हिशोब नसणे आदी कारणांमुळे या दुकानाचे प्राधिकार पत्र रद्द करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com