कॉंग्रेसला गांधींचे विचार नाही; तर नोटांवरील गांधी दिसले : पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

जळगाव ः ब्रिटीशांपेक्षा ज्यांनी देशावर जास्त राज्य केले; त्या कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसला आता देशात गरीबी दिसत आहे. यामुळे राहुल गांधी गरीबी हटावचा नारा देताय. यापुर्वी त्यांना गरीबी दिसली नाही का? शिवाय महात्मा गांधीचे नाव घेवून मत मागणाऱ्यांचे नोटा मोजण्यातच आयुष्य गेले. गांधींजींचे विचार नाही तर केवळ नोटांवरील गांधी दिसल्याचा आरोप महाराष्ट्र राज्याच्या महिला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे जाहीर सभेत केला. 

भाजप- शिवसेना महायुतीचे जळगाव लोकसभेतील उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ आज (ता.20) सायंकाळी मेहरूण परिसरात झालेल्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. सभेप्रसंगी आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, महापौर सिमा भोळे, उमेदवार आमदार उन्मेष पाटील, मनपाचे गटनेता भगत बालाणी, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर ललीत कोल्हे, विष्णु भंगाळे, मनपा विरोधी पक्षनेता सुनील महाजन, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जाकीर पठाण, शोभा चौधरी, वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे आदी उपस्थित होते. 
मंत्री मुंडे म्हणाल्या, की कॉंग्रेसला घराणेशाही आणि रिमोट कंट्रोलद्वारे चालणारे शासन दिले; तेव्हा देशातील गरीबी दिसली नाही. कॉंग्रसने साठ वर्षात केले नाही; ते पंतप्रधान मोदींनी साडेचार वर्षात केले. मोदी सरकारने काय केले हे विसरता येणार नाही. कारण ज्यांनी गरीबी जगली आणि भोगली आहे. ग्रामविकास मंत्री म्हणून मोदी सरकारच्या स्वच्छता अभियानातून शंभर टक्‍के शौचालय पुर्ण केले. यामुळे रस्त्यावर शौचास बसणारे कोणी दिसत नाही. कॉंग्रेसला पर्याय म्हणून भाजप आल्यानंतर भाजप हे अल्पसंख्यांक विरोधी पार्टी असल्याचा प्रचार कॉंग्रेसने सुरू केला होता. पण सर्जिकल स्ट्राईकने उत्तर देण्याचे काम मोदींनी केले, हे सर्वांनी पाहिले. कॉंग्रेसने मोदी हटावचा नारा सुरू केला आहे. पण मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. 

Web Title: marathi news jalgaon pankaja munde prachar sabha unmdesh patil