सात दशकात जिल्ह्याची लोकसंख्या तिप्पट ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

जळगाव : दिवसेंदिवस भारताच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शासनाकडून 1951 मध्ये देशाची पहिली जनगणना करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्याची लोकसंख्या 14 लाख 71 हजार इतकी होती मात्र गेल्या सात दशकात जिल्ह्याच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होऊन आताच्या स्थितीमध्ये जिल्ह्याची लोकसंख्याही 45 लाखापर्यंत पोहचली आली. त्यामुळे झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येवर शासनाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. 

जळगाव : दिवसेंदिवस भारताच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शासनाकडून 1951 मध्ये देशाची पहिली जनगणना करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्याची लोकसंख्या 14 लाख 71 हजार इतकी होती मात्र गेल्या सात दशकात जिल्ह्याच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होऊन आताच्या स्थितीमध्ये जिल्ह्याची लोकसंख्याही 45 लाखापर्यंत पोहचली आली. त्यामुळे झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येवर शासनाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. 

देशात लोकसंख्येचा विस्फोट होत असून वाढत्या लोकसंख्येमुळे शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे अन्न, वस्त्र, निवारा या दैनंदिन गरजांसह रोजगाराचा प्रश्‍न देखील गंभीर बनत चालला आहे. देशभरात 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. देशासह राज्यभरात 1951 साली देशाची जनगणना झाली होती. यावेळी जिल्ह्याची लोकसंख्या ही 14 लाख इतकी होती मात्र या गेल्या सत्तर वर्षात यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेची संभाव्य आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या सात दशकांमध्ये जिल्ह्याच्या लोकसंख्येत 32 लाख 46 इतकी वाढ झाली असून सन 2021 मध्ये जिल्ह्याची लोकसंख्या 45 लाख 17 हजार इतकी असणार असल्याची माहिती जिल्हा सांख्यिकी अधिकारी प्रमोदराव पाटील यांनी दिली. 

मुलींच्या जन्मदरात वाढ 
राज्यात मुलींचा जन्मदर बीडमध्ये सर्वांत कमी आहे. त्यानंतर जळगावचा दुसरा क्रमांक लागतो. यावेळी जिल्हा प्रशासनाने बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम राबविली होती. ही मोहीम यशस्वी झाल्यामुळे गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदारात वाढ झाली असल्याचे देखील समोर आले आहे. 

चाळीसगाव तालुका आघाडीवर 
जागतिक जनगणना झाली तेव्हा जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्‍यात सर्वाधिक लोकसंख्या होती. आता सत्तर वर्षात हा आलेख उंच होत गेला असून चाळीसगाव तालुक्‍याची आताची लोकसंख्या ही 4 लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पूर्वीपासून लोकसंख्येच्या अग्रभागी असलेल्या चाळीसगावात इतर जिल्ह्याच्या तुलनेत सर्वाधिक लोकसंख्या असून त्या पाठोपाठ भुसावळ तालुक्‍याचा क्रमांक लागतो. तर सर्वांत कमी लोकसंख्या असलेला तालुका म्हणून बोदवड तालुका आहे. या तालुक्‍याची लोकसंख्या 96 हजार इतकी असून सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेला तालुका म्हणून त्याची नोंद झाली आहे. 

ऑनलाइन होणार जनगणना 
दर दहा वर्षानंतर देशाची जनगणना केली जाते. आतापर्यंत शिक्षकांसह शासकीय कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन माहिती गोळा करून पेपरवर माहिती गोळा केली जायची. परंतु आगामी 2021 मध्ये होणारी आर्थिक जनगणना ही ऑनलाइन पद्धतीने होणार यामुळे वेळेची बचत व कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon papulation day