प्लास्टिक बंदी मोहिमेचा सुटीमुळे बोजवारा; जिल्ह्यात कारवाई शून्य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

जळगाव ः राज्यात आजपासून प्लॅस्टिक बंदीची कारवाईस सुरवात झाली आहे. मात्र, आज चौथ्या शनिवारची सुटी असल्याने शासकिय कार्यालय बंद होते. यामुळे कर्मचारी सुटीवर असल्याने जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. राज्यात इतर महापालिका प्रशासनाकडून पहिल्याच दिवशी प्लॅस्टीक उत्पादक, कॅरीबग विक्री करणाऱ्यांवर कारवाई झाली. मात्र जळगाव मनपाच्या आरोग्य विभागाकडून शहरात एक देखील कारवाई प्रशासकीय सुट्टी असल्याच्या कारणातून केली नाही. त्यामुळे बाजारांमध्ये सर्रास प्लॅस्टीक पिशव्यांसह वस्तूंचा वापर सुरू असल्याचे आज दिसत होते. 

प्लास्टिक बंदीबाबत शहरात गेल्या काही दिवसापासून मोहीम राबविण्यात येत आहे. अनेकांना दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, राज्यशासनाने आजपासून सुरू केलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेला कर्मचाऱ्यांचा सुटीचा अडथळा निर्माण झाला. सायंकाळपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही. यात अमळनेर नगरपालिकेकडून सायंकाळी उशिरा आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण यांच्या पथकाने सायंकाळी विविध भागात जाऊन व्यापाऱ्यांना प्लास्टिक बंदीबाबत आवाहन केले. तसेच पालिकेतर्फे रिक्षाद्वारे ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून जनजागृतीही करण्यात आली. 

सुटीमुळे कारवाई टळली 
प्लास्टिक बंदी जाहीर झाल्याने प्लास्टिक विक्रेत्यांवर पारोळा पालिका प्रशासनाकडून शोध मोहीम घेऊन दंडात्मक कारवाई करणे आजपासून अपेक्षित होते. राज्यात इतर ठिकाणी दंडात्मक कारवाया झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, येथे व परिसरात चौथा शनिवार असल्याने कार्यालयास शासकीय सुटी होते. यामुळे शनिवार व रविवार दोन दिवस सुटीचे आल्याने पालिका प्रशासनाने आजपासून लागू असलेल्या या निर्णयाला महत्व न देता सोमवारपासून मोहीम सुरू करण्यास महत्व दिले आहे. परिणामी पालिकेचा कारवाईचा आजचा मुहूर्त टळला असल्याचे दिसून येत आहे. 

सोमवारपासून मोहिम 
प्रशासनाचे आरोग्य विभाग सोमवार पासून शासनाने बंदी घातलेल्या प्लॅस्टीक उत्पादन व प्लॅस्टीक पिशव्यावर कारवाईला सुरवात करणार आहे. आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याशी आरोग्य अधिकारी चर्चा करून कारवाई बाबत नियोजन ठरविणार आहे. तसेच शहरात आरोग्य विभागाच्या गाड्या घेवून व्यापारी व नागरिकांना प्लॅस्टीक पिशव्या अन्य बंदी घातलेले साहित्य जमा करण्याचे जनजागृती करणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी दिली. 

Web Title: marathi news jalgaon plastic ban