सहा लाखाचे प्लास्टिक पिशव्या, थर्माकॉलचे वस्तू जप्त ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मार्च 2019

जळगाव ः शहरात प्लॅस्टीक विक्री कारवाई थंडावली असल्याने महापालिका आयुक्त आयुक्त उदय टेकाळे यांनी सोमवारी दिलेल्या आदेशावरून महापालिकेच्या आरोग्य व अतिक्रमण निर्मूलन विभागाने 
आज शहरातील विविध भागात कारवाई केली. या कारवाईत सुमारे सहा लाख रुपये किंमतीचे साडे तीन क्विंटल प्लास्टिक पिशव्या व थर्मकॉलचा साठ जप्त करण्यात आला. तसेच 50 हजाराचा विक्रेत्यांना दंड ठोठविला. 

राज्य शासानाने 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या, थर्मकॉल आदी पर्यावरणाला घातक असलेल्या प्लॅस्टीक विक्रीवर बंदी आणली आहे. लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर प्लास्टिक 
वापराविरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाने अनेक व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यामध्ये धडकी भरली होती. तसेच प्लास्टिक विक्रीत मोठ्याप्रमाणात घट देखील झाली होती. मात्र, महापालिकेच्या पथकाकडून होणारी कारवाई थंडावल्यामुळे पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्या व थर्माकॉलचा वापर सर्रास सुरु झाला होता. त्यानुसार सोमवारी आयुक्त उदय टेकाळे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना प्लॅस्टीक विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सकाळ पासून आरोग्य व अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे प्लॅस्टीक विक्रेत्यांवर आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाने आरोग्य अधीक्षक एच. एम. खान, एल. बी. धांडे, एस. एच. ढंढोरे, ए. के.सोनवाल, के.आर. बारसे, जितेंद्र गोयर यांनी कारवाई केली. 

300 किलोपेक्षा अधिक साठा 
बळीराम पेठमध्ये प्लॅस्टीक कारवाई प्रसंगी श्रीराम प्लास्टिकच्या गोडावूनची तपासणी करत असताना त्या ठिकाणी 300 किलोहून अधिक प्लास्टिक पिशव्या व थर्मकॉलचा साठा सापडला. गोडावून मध्ये थर्माकॉलचे पत्रवाळ्या, प्लेट, ग्लॉस तसेच अनेक लग्नसमांरभात वापरला जाणारे साहित्य जप्त करण्यात अले. संबधित गोडावून मालकाला 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon plastic ban 6 lakh carrybag