"प्लास्टिक'विरोध मोहीम पुन्हा जोर धरणार 

"प्लास्टिक'विरोध मोहीम पुन्हा जोर धरणार 

जळगाव ः राज्य शासनाने प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांकडून प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तू विक्रेत्यांवर जोरदार कारवाई केली. परंतु, ही कारवाई गेल्या काही महिन्यांपासून थंडावल्याने पुन्हा शहरात सर्रास प्लास्टिकचा वापर सुरू होता. याबाबत आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी प्लास्टिक पिशव्या विक्रीवर कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. 
प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर प्लास्टिक वापराविरोधात महापालिकेच्या आरोग्य विभागाने अनेक व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये धडकी भरली होती. तसेच प्लास्टिक विक्रीत मोठ्या प्रमाणात घटही झाली होती. मात्र, महापालिकेच्या पथकाकडून होणारी कारवाई थंडावल्यामुळे पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्या व थर्माकोलचा वापर सर्रास सुरू झाला होता. त्यानुसार आयुक्तांनी डॉ. उदय टेकाळे यांनी महापालिकेचे आरोग्य अधिकारी उदय पाटील यांना कारवाईचे आदेश दिले. तसेच आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनीही तत्काळ या आदेशाच्या अनुषंगाने शहरातील सर्व आरोग्य निरीक्षकांची बैठक घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. 

ओला-सुका कचरा वेगळा घ्या 
शहरातील दैनंदिन कचरा संकलन एकमुस्त ठेक्‍यात केले जाणार आहे. त्यापूर्वी नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा देण्याची सवय लागावी, यासाठी आता सुरू असलेला कचरा संकलनात ओला व सुका कचरा वेगळा घेण्याच्याही सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या. 

प्लास्टिक विक्रेत्यांना होणार दंड 
किराणा पिशवी, झबला पिशवी, प्लास्टिक ग्लास, हॉटेलमध्ये पार्सल करून देण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक डबे, थर्माकोल असे साहित्य वापरले जात असून जिथे आढळले तिथे हे प्लास्टिक जप्त करून दंडाची आकारणी करण्यात येणार आहे. यापूर्वी ज्याप्रमाणे कारवाई करण्यात येत होती. त्याचप्रमाणे पाचपासून पंचवीस हजारांपर्यंत दंड विक्रेत्यांकडून आकारले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com