जळगावच्या उद्योगांत 75 टक्के प्लॅस्टिकचा पुनर्वापर 

सचिन जोशी
मंगळवार, 23 जुलै 2019

जळगाव : पॉलिमर इंडस्ट्री म्हणून लौकिकप्राप्त असलेल्या जळगाव एमआयडीसीतील चटईसह पीव्हीसी पाइप व ठिबक नळ्यांच्या उत्पादनासाठी दररोज सुमारे साडेचारशे टन प्लॅस्टिक वापरले जात असून, त्यापैकी तब्बल साडेतीनशे टन (जवळपास 75 टक्के) कच्चा माल पुनर्वापर (recycling) केलेल्या प्लॅस्टिकचा आहे. विशेष म्हणजे हा कच्चा माल कचरा झालेल्या प्लॅस्टिकमधून तयार होतो, त्यामुळे दररोज साडेतीनशे टन प्लॅस्टिक रस्ते, खुले भूखंड अथवा नदी-नाल्यांमध्ये न जाता या उद्योगासाठी वापरले जात आहे. 

जळगावातील औद्योगिक वसाहत पॉलिमर इंडस्ट्री म्हणून प्रसिद्ध आहे. एकूण उद्योगांच्या 75 टक्के उद्योग प्लॅस्टिकवर आधारित अर्थात चटई, पीव्हीसी पाइप व ठिबक सिंचनासाठी लागणाऱ्या नळ्यांचे उत्पादन घेणारे आहेत. चटई उत्पादन करणारे 170, पीव्हीसी पाइप बनविणारे 100 तर ठिबकच्या नळ्यांचे उत्पादन घेणारे 50 उद्योग या ठिकाणी कार्यरत आहेत. या प्रत्येक उद्योगात मोठ्या प्रमाणात म्हणजे तब्बल 95 टक्के कच्चा माल प्लॅस्टिकचा वापरला जातो, त्यापैकी 90 टक्के प्लॅस्टिक पुनर्वापरातून तयार होते, तर 10 टक्के व्हर्जिन मटेरिअल वापरले जाते. 

चटई उत्पादनात अग्रेसर 
चटईच्या जवळपास 160 युनिटसाठी महिन्याला जवळपास पाच हजार टन प्लॅस्टिक लागते. त्यासाठी लागणारा कच्चा माल जळगावसह महाराष्ट्रातील अन्य शहरांमधून तसेच हैदराबाद, केरळ आदी भागांतून येतो. दररोज कचऱ्यात जाणारे प्लॅस्टिक जमा करून रंगानुसार वेगळे केले जाते व त्यावर प्रक्रिया करून त्यातून चटईसाठी लागणारा कच्चा माल (दाणा) तयार केला जातो. चटई उत्पादनातून निघणाऱ्या वेस्टेजचाही पुनर्वापर होतो. चटई उद्योगात महिन्याला सुमारे साडेचार ते पाच हजार टन प्लॅस्टिकचा वापर होतो. 

पीव्हीसी, ठिबकसाठीही उपयोग 
जैन इरिगेशन, सुप्रिम पाइप यांसारख्या कंपन्या पूर्णपणे व्हर्जिन मटेरिअल वापरतात. मात्र, जळगाव एमआयडीसीतील 50 ठिबक व 100 पीव्हीसी पाइप उत्पादन करणारे कारखाने 75 टक्के कच्चा माल पुनर्वापराच्या प्लॅस्टिकचा वापरतात. उर्वरित 25 टक्के व्हर्जिन मटेरियलचा वापर होतो. पाइप व ठिबक नळ्यांच्या उत्पादनासाठी महिन्याला सुमारे चार हजार टन पुनर्वापर झालेले प्लॅस्टिक उपयोगात येते. 

असा होतो प्लॅस्टिकचा पुनर्वापर 
चटई उत्पादक उद्योग : 170 
पीव्हीसी पाइप उद्योग : 100 
ठिबक नळ्यांचे उत्पादक : 48 
तीनही उद्योगांना रोज लागणारे प्लॅस्टिक : सुमारे 450 टन 
पुनर्वापर होणारे प्लॅस्टिक : 350 टन 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon plastic reuse 75 parsntage