पोलिसांना "मामा' बनवण्याच्या प्रयत्नात दुचाकीला अपघात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

जळगाव : जळगाव जिल्हा पोलिस दलातर्फे बेशीस्त वाहतुकीसह अपघात रोखण्याच्या दुष्टीने प्रयत्न सुरु आहेत. वाढत्या अपघातांची संख्या आणि अल्वयीन दुचाकीस्वार तरुणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोहीम राबवली जात असुन याच मोहीमेअंतर्गत सुरु असलेल्या तपासणी वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रिपलसीट दुचाकीस्वार पळून जातांना जखमी झाल्याची घटना काव्य रतनावली चौकात दुपारी बारा वाजता घडली. 

वाहतूक विभागातर्फे शहरात वाहन तपासणी करण्यात येत आहे. विना परवाना वाहन चालवणारे अल्पवयीन विद्यार्थ्यांवर कारवाई साठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून या अतंर्गत दिवस भरातून पन्नास ते पच्चावन्न वाहने ताब्यात दंडात्मक कारवाई करण्यात येते. तसेच अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना अधिकाऱ्यांकडून समुपदेशन आणि समज देण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणुन काव्य रत्नावली चौकात वाहतुक विभागातर्फे तपासणी सुरु होती. शिरसोली नाका डी-मार्ट कडून महाबळ कॉलनीत जाण्यासाठी मिहीर संतोष तायडे(वय-17), जतीन तायडे (वय-15) याच्यासह नरपत पुखराज टाक (वय-17) असे तिघेही मोटारसायकल(एमएच.19.बीसी.5596) ने निघाले असतांना त्यांना वाहतुक पोलिसांची तपासणी होत असल्याचे दिसल्याने चौकात आल्यावर कारवाई पासुन वाचण्यासाठी दुचाकी अतिवेगात वळण घेवुन पळून जाण्याच्या प्रयत्नात दुभाजकावर आदळली. या अपघातात तिघेही जखमी झाले असून पोलिसांनी नागरीकांच्या मदतीने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात हलवले. तिघेही ऍक्वा-स्पा येथे स्विमींग साठी गेले होते,तेथून परतत असतांना हा अपघात झाला असून या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात येणार असल्याचे वाहतुक पोलिसांनी सांगीतले.

Web Title: marathi news jalgaon police accidant