पोलिसांच्या शस्त्र प्रदर्शनातूनच रिव्हॉल्वर लांबवली 

पोलिसांच्या शस्त्र प्रदर्शनातूनच रिव्हॉल्वर लांबवली 

जळगाव ः जिल्हा पोलिस दलातर्फे महाराष्ट्र पोलिस स्थापना दिवस निमित्त जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकात शस्त्रप्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनातूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतांना देखील एक रिव्हॉल्वर लांबविण्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. 

शस्त्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन सकाळी पोलिस अधिक्षक दत्ता शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रदर्शन बघण्यासाठी सकाळ पासून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच अन्य नागिरकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती. या गर्दीतूनच दुपारी चार वाजता कोणीतरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतांना देखील रिव्हॉल्वर लांबवलीची घटना घडली. या रिव्हॉल्वरची किमंत 15-16 हजार रुपये किंमत सांगितली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com