पोलिसांचे दिवसातून तिनवेळेस सॅनिटाईज्ड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या हस्ते या व्हॅनचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन आदींची उपस्थिती होत. 

जळगाव  : कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र खबरदारीच्या उपाय योजना करण्यात येत आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी खास सॅनिटाझर व्हॅन तयार करण्यात आली असून पोलिस अधीक्षकांच्या हस्ते या व्हॅनचे आज उद्‌घाटन करण्यात आले. 

कोरोना विषाणूंच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉकडाउनची स्थिती आहे. गेले तीन आठवडे सर्वत्र संचारबंदी आणि कलम-144 लागू करण्यात आले असून अत्यावश्‍यक सेवा वगळता संपूर्ण जिल्ह्यातील बाजारपेठा बंद आहेत. शासकीय रुग्णालयातील डॉक्‍टर्स आणि पोलिसदल चोवीस तास सेवेत असून शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. बंदोबस्तावर तैनात कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी खास सॅनिटाझर व्हॅन तयार करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या हस्ते या व्हॅनचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन आदींची उपस्थिती होती. 

आर्वजून पहा : जिल्ह्यात दीड हजारांवर रक्तपिशव्यांचा साठा 
 

धोका कमी होण्यास मदत 
बंदोबस्तावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांजवळ जाऊन ही व्हॅन कर्मचाऱ्यांना दिवसातून तीन वेळेस सॅनिटाईज्ड करणार असून सामान्य जनतेलाही याचा वापर करता येणार आहे. यामुळे ड्यूटीवर तैनात कर्मचाऱ्यांचा संक्रमणाचा धोका कमी होणार आहे. 
 

क्‍लिक कराः  कोरोना इफेक्‍ट: कॉस्मेटिक उत्पादकांना कोट्यवधींचा फटका ! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Police sanitized three times a day