पोलिस ठाण्यासमोरील दुकान फोडले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

जळगाव : शहरातील फुले मार्केटमधील न्यू ज्योती जनरल स्टोअर्स या दुकानाचे मध्यरात्री कुलूप तोडून चोरट्यांनी 40 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. दुकानमालकाच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिंधी कॉलनीतील समाधानगरमध्ये राहणारे श्‍याम सखाबतराय ललवाणी यांचे फुले मार्केटमध्ये न्यू ज्योती जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. ललवाणी यांनी रविवारी (29 एप्रिल) सायंकाळी पाचला नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते. मध्यरात्री चोरट्यांनी शटरचे दोन्ही कुलूप तोडून दुकानात प्रवेश आत प्रवेश केला. दुकानातील रोकड असलेले ड्राव्हरचे कुलूप तोडून त्यांनी 40 हजार रुपयांची रोकड लांबविली. आज सकाळी साडेसातच्या सुमारास काही नागरिकांना दुकानाचे शटर उघडे दिसले. त्यानंतर दुकानमालक श्‍याम ललवाणी हे दुकानावर आले. त्यांनी तत्काळ शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन घटना जाणून घेतली. याबाबत दुकानमालक श्‍याम ललवाणी यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक निरीक्षक महेश जानकर तपास करीत आहे.

Web Title: marathi news jalgaon police station shop