जळगाव जिल्ह्यात मतदान यंत्रासह कर्मचारी रवाना 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

जळगाव ः जळगाव व रावेर लोकसभेसाठी उद्या (ता.23) मतदान होणार आहे. या मतदानासाठी जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदान साहित्यचे वाटप आज सकाळी आठ वाजेपासून सुरू झाले. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तहसिल कार्यालयाच्या परिसरातून साहित्याचे वाटप करण्यात आले. 

लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या (ता.23) जिल्ह्यात होत आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी पुर्ण झाली असून, आज मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. मतदान कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मतदान यंत्र, व्हीव्हीपॅड मशिन कसे ऑपरेट करावे; याबाबत माहिती देण्यात आली. जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसिलदार वैशाली हिंगे यांच्यासह विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान साहित्याचे वाटप झाले. मतदान साहित्य नेण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या 435 बस बुकींग करण्यात आल्या असून, मतदान यंत्र नेणे आणि मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर बसमधूनच यंत्र आणले जाणार आहेत. तसेच मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त तैनार करण्यात आला आहे. मतदान कर्मचारी व पोलिस आजच नेमलेल्या केंद्रावर रवाना झाले आहेत. 

Web Title: marathi news jalgaon poling buth election evm machine dispach