जिल्ह्यात आज प्रचाराच्या तोफा थंडावणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

जळगाव ः जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघात गेल्या आठ एप्रिलपासून सुरू झालेली लोकसभेच्या प्रचारतोफा उद्या (ता.21) थंडावणार आहेत. उद्या रविवार असल्याने अनेक मतदार घरीच असतील ती संधी साधून उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते प्रचाराची संधी साधतील.यामुळे रविवार हा प्रचारवार ठरणार आहे. 

माघारीनंतर उमेदवारांना सुमारे पंधरा दिवस प्रचारास मिळाले आहेत. यात उमेदवारांनी राज्यातील मात्तबर नेत्यांना प्रचारास आणले होते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पक्षाचे अध्यक्ष शरद पवारासह अनेक नेते, भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी नेते, कॉंग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण प्रचाराला येवून गेले आहेत. यासह स्थानीक पातळीवरील पदाधिकारीही प्रचार करीत आहे. यामुळे पंधरा दिवसात प्रचार शिगेला पोचला आहे. उद्या (ता.21)सायंकाळी जाहीर प्रचार संपेल. 23 ला सकाळी सात ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होईल. 

जळगाव मतदारसंघ ः 
भाजपतर्फे आमदार उन्मेष भय्यासाहेब पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गुलाबराव बाबूराव देवकर, बहुजन समाज पार्टीतर्फे राहुल नारायण बनसोडे, वंचित बहुजन आघाडीतर्फे अंजली रत्नाकर बाविस्कर, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे ईश्वर दयाराम मोरे, राष्ट्रीय समाजवादी पक्ष (सेक्‍युलर)तर्फे मोहन शंकर बिऱ्हाडे, राष्ट्रीय जनशक्ती पार्टी (सेक्‍युलर)तर्फे शरद गोरख भामरे- सुतार, हिंदुस्थान निर्माण दलातर्फे संतश्री बाबा महाहंसजी महाराज पाटील, अपक्ष उमेदवार- अनंत प्रभाकर महाजन, ओंकार आबा चेनसिंग जाधव, मुकेश राजेश कुरील, ललित (बंटी) गौरीशंकर शर्मा, सुभाष शिवलाल खैरनार, संचेती रूपेश पारसमल. 

रावेर मतदारसंघात कॉंग्रेसतर्फे डॉ. उल्हास वासुदेव पाटील, भाजपतर्फे रक्षा निखिल खडसे, बहुजन समाज पार्टीतर्फे डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते, राष्ट्रीय आम जनसेवा पार्टीतर्फे अजित नामदार तडवी, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियातर्फे अडकमोल रोहिदास रमेश, वंचित बहुजन आघाडीतर्फे नितीन प्रल्हाद कांडेलकर, हिंदुस्थान जनता पार्टीतर्फे मधुकर सोपान पाटील, इंडियन युनियन मुस्लिम लीगतर्फे रोशन आरा सादिक अली, अपक्ष उमेदवार - गौरव दामोदर सुरवाडे, तंवर विजय जगन, नजमीन शेख रमजान, डी. डी. वाणी हे रिंगणात आहेत. 

Web Title: marathi news jalgaon prachar tofa last day today