रेल्वेचा चार दिवस ब्लॉक उद्यापासून मुंबई पॅसेंजर रद्द 

रेल्वेचा चार दिवस ब्लॉक उद्यापासून मुंबई पॅसेंजर रद्द 

भुसावळ : मध्य रेल्वेतर्फे इगतपुरी येथे विशेष ब्लॉक घेणार असल्याने 27 ऑक्‍टोबरपासून चार दिवस भुसावळ-मुंबई पॅसेंजरसह एलटीटी-मनमाड एक्‍स्प्रेस अप आणि डाऊन मार्गावर रद्द केली आहे. तसेच हुतात्मा एक्‍स्प्रेस मनमाड दौंडमार्गे वळविली असून काही गाड्या अर्धा-एक तास उशिराने धावणार आहे. 

इगतपुरी येथे नवीन रूट रिले इंटरलॉकिंग पॅनल आणि यार्ड रीमॉडलिंगचे काम केले जाईल 
यात 27, 28, 29, 30 ऑक्‍टोबरला लोकमान्य तिलक टर्मिनस-मनमाड-लोकमान्य तिलक टर्मिनस एक्‍स्प्रेस, मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर रद्द केली आहे. अप आणि डाऊन मार्गावरील भुसावळ-पुणे हुतात्मा एक्‍स्प्रेस दौंड-मनमाडमार्गे धावणार आहे. 
28 ऑक्‍टोबरला पाटलिपुत्र-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस, इलाहाबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरंतो एक्‍स्प्रेस, छपरा- लोकमान्य तिलक टर्मिनस एक्‍स्प्रेस आणि गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस अर्धा ते एक तास उशिराने धावतील. 
29 ऑक्‍टोबरला पाटलिपुत्र-लोकमान्य तिलक टर्मिनस एक्‍स्प्रेस, पटणा-मुंबई सुविधा एक्‍स्प्रेस, गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस, लखनऊ-लोकमान्य टिळक टर्मिनस एसी एक्‍स्प्रेस, गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस वाया इलाहाबाद तथा गोरखपूर-पनवेल एक्‍स्प्रेस उशिराने धावतील. 30 ऑक्‍टोबरला गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस वाया इलाहाबाद उशिराने धावणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com