खानदेशात मुसळधार पाऊस,वीज पडून दोघे ठार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

जळगाव\धुळे : जळगाव आणि धुळे जिल्ह्यात आज पहाटेपासून आलेल्या जोरदार पावसाने दोघांचा बळी घेतला साक्री तालुक्‍यातील देऊर येथे एका तरूणाचा आणि बोदवड तालुक्‍यातील जुनोना येथे एका मेंढपाळाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे. 
काही भागात हा पाऊस मध्यम स्वरूपाचा कोसळला तर काही भागात त्याचा जोर चांगला असल्याने त्याचा शेती पिकांना अधिक लाभ होणार आहे.तसेच जलसाठे भरण्यासाठी हा लाभदायक आहे. 

जळगाव जिल्ह्यात कालपासूनच पावसाला सुरवात झाली,आजही जळगाव शहर,व तालुक्‍यातील काही भाग,तसेच पाचोरा,चाळीसगाव,यावल,बोदवड तालुक्‍यात मुसळधार पावसाने हजेरी लावली,बोदवड तालुक्‍यात जुनोना येथे एका मेंढपाळाचा वीज पडून मृत्यू झाला आहे तर काल या तालुक्‍यातील पूरात वाहून गेलेल्या विद्या चौधरी या तरूणीचा मृतदेह उजनी रस्त्यवरील तलावात आढळला.पाचोरा तालुक्‍यात सांगवीत उतावळी नदीला पूर आला.यावल तालुक्‍यात दुपारी जोरदार पाऊस कोसळला.कालपासून पावसाने खानदेशात तिघांचे बळी घेतले आहेत.

Web Title: marathi news jalgaon rain 2 daith