पावसाअभावी जिल्ह्यात पाणी संकट 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

जळगाव ः पावसाळा सुरू होऊन तब्बल सव्वा महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्यापही समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. यामुळे जिल्ह्यात आठ मध्यमप्रकल्पात पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांत पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. 
जून महिना सुरू होताच दोन ते पाच जून दरम्यान पावसाने हजेरी लावली. नंतर मात्र थेट वीस दिवसांनंतर पावसाने हजेरी लावली. त्यातही खंड पडला. अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. पाऊस लवकर पडावा, यासाठी शेतकरी बांधव प्रार्थना करीत आहेत. 

जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 19.3 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाची सरासरी 663.3 मिलिमीटर आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ 127.4 मिलिमीटर पाऊस झाला आहे. 
जिल्ह्यातील वाघूर, हतनूर, गिरणा या धरणात अल्पसा पाणीसाठा आहे. इतर धरणात मात्र ठणठणाट आहे. 

धरणातील पाणीसाठा असा (दशलक्ष घनमिटरमध्ये) 
हतनूर--15.30 
गिरणा--136.77 
वाघूर--157.23 
अभोरा--3.32 
मंगरूळ--3.80 
सुकी--19.03 
मोर--23.99 
अग्नावती--0.00 
िहवरा--0.00 
बहुळा-0.00 
तोंडापूर--0.00 
अंजनी-0.00 
गूळ--15.16 
भोकरबारी--0.00 
बोरी--0.00 
मन्याड--0.00 

Web Title: marathi news jalgaon rain dam water