जिल्ह्यातील शाळा तंबाखुमुक्‍त करण्याचा ध्यास; कर्करोगग्रस्त खान शिकलगरांचे अभियान 

cancer day.
cancer day.

चोपडा : शहरातील राज मोहम्मद खान शिकलगर गेल्या दहा वर्षांपासून तंबाखू सेवनाने तोंडाच्या कर्करोगाने त्रस्त आहेत. यावर त्यांनी मात केली असून, आता तंबाखूमुक्‍त अभियान राबवून अभियानासाठी जीवन समर्पित केले आहे. जिल्ह्यातील शाळा तंबाखुमुक्‍त करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. 

शिकलगर यांना २०१० मधे तंबाखूच्या व्यसनामुळे तोंडाचा कॅन्सर झाला होता. जीवन मिळेल का नाही मिळेल याची शाश्वती न होती पण राज मोहम्मद यांनी हार पत्करली नाही. देवाकडे प्रार्थना केली. माझी जी चूक झाली ती दुसऱ्याकडून होऊ नये म्हणून त्यांनी उर्वरित आयुष्य जनजागृतीच्या कामासाठी समर्पित केले. बरे झाल्यावर त्यांनी तंबाखू मुक्तीचा वसा घेतला. राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी महिन्याचे १२ दिवस या कामासाठी काढले. सतत आपले कार्य चालू ठेवले. जन मानवता बहुउद्देशीय संस्थेतर्फे त्यांनी कॅन्सर पेशंट हेल्प सेन्टरची स्थापना केली. तंबाखू विरोधी अभियान चालू केले. आतापर्यंत शिकलगर यांनी ३०० च्या वर लोकांनी तंबाखू, गुटखाचे व्यसन सोडविले आहे. ५०० च्यावर कॅन्सरग्रस्त लोकांना मार्गदर्शन व मदत केली आहे. त्यांचे हे कार्य अविरतपणे चालू आहे. कॅन्सरग्रस्त परिवारातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करतात. अन्न धान्याचे कीट देतात. मुलींना लग्नाचं साहित्य देतात. लवकरच शिलाई मशीन देऊन कॅन्सरग्रस्त परिवारांचे पुनर्वसन ते करणार आहेत. कॅन्सरग्रस्त परिवारातील मुलींचे १ रुपयामध्ये लग्न लावण्याचा त्यांचा मानसही आहे. 

तंबाखुमुक्‍तीचे विशेष अभियान 
राज्य शिक्षण विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन, जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व जनमानवता बहुउद्देशीय संस्था (चोपडा) तंबाखुमुक्त शाळेसाठी अभियान राबवीत आहेत. या अभियानात शिकलगर यांनी झोकून दिले आहे. अहोरात्र त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा हे लवकरच जागतिक स्तरावर तंबाखू मुक्त शाळेचा व्हावा असे त्यांचे प्रयत्न आहेत.या अभियानात त्यांना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील, शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, विजय पवार, सलाम मुंबई फाउंडेशनचे अजय पिळणकर, संजय आंघे, जिल्हा समन्वयक जयेश माळी, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे डॉ. नितीन भारती, राहुल बऱ्हाटे आदींचे सहकार्य लाभत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com