Loksabha 2019 : "राष्ट्रवादी'च्या देवकरांसमोर भाजपला उमेदवाराचा शोध 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे राज्यातील अकरा लोकसभा मतदार संघांच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यात जळगाव मतदार संघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. मंत्रिपदाच्या काळात केलेली विकासकामे, तसेच विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांसमवेतही आपुलकी, दांडगा जनसंपर्क आणि जिल्ह्यात मजूर सोसायट्यांचे जाळे, यामुळे देवकर यांची उमेदवारी भक्कम मानली जात होती. पक्षाने आज त्यांचे नावे अधिकृतपणे घोषित केले आहे. 

विशेष म्हणजे, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून ते प्रथमच विधानसभेवर निवडून गेले होते. आघाडी सरकारच्या काळात कृषी राज्यमंत्री व पालकमंत्री असताना त्यांनी मतदार संघात कामे केली, तसेच पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांसोबतही आपुलकी ठेवली. या शिवाय मजूर सोसायटीचे ते चेअरमन आहेत. जिल्ह्यात असलेल्या मजूर सोसायटीचे जाळे ही सुद्धा त्यांची जमेची बाजू आहे. या शिवाय जळगाव नगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. त्यामुळे त्यांची बाजू भक्कम आहे. त्यांना पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी मिळण्याचे संकेत अगोदरच मिळाले होते. त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेमुळे भाजपला त्यांच्या विरुद्ध कट्टर उमेदवाराचा शोध घ्यावा लागत आहे. भाजपचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांची उमेदवारी अगोदरच गोत्यात आली आहे. त्यात देवकर यांच्यासारखा राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिल्यामुळे भाजपला उमेदवारांचा शोध घ्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भाजपचा उमेदवार कोण? याचीच उत्सुकता आहे. 
 
प्रचाराला वेग 
पक्षातर्फे पहिल्याच यादीत गुलाबराव देवकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अधिकृत घोषणेमुळे देवकर आता वेगाने प्रचारास लागले आहेत. त्यांनी आज पाचोऱ्यासह विविध ठिकाणी जाऊन पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केले. 

Web Title: marathi news jalgaon rashtrawadi candidate devkr Bjp serching