अजित पवारांच्या केसालाही धक्का लावल्यास आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

जळगाव : राज्यात सत्तेत आल्यापासून भाजप सरकारने कथित सिंचन गैरव्यवहारप्रकरणी कोणत्याही हालचाली अथवा कारवाई केली नाही. आणि आता वर्षभरात निवडणुका असल्याने केवळ राजकीय सूडबुद्धितून अजित पवारांविरोधात षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप करत राष्ट्रवादीच्या बैठकीत सरकारचा निषेध करण्यात आला. याप्रकरणी अजितदादांच्या केसालाही धक्का लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या बैठकीतून देण्यात आला. 

तत्कालीन आघाडी सरकारच्या कार्यकाळात विदर्भातील सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याप्रकरणी अनेक तक्रारी दाखल होऊन गुन्हेही दाखल आहेत. अभियंते, अधिकारी, कंत्राटदारांसह तत्कालीन जलसंपदामंत्री म्हणून अजित पवारांवरही आरोप होत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने यासंदर्भात कालच उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत अजित पवारही सिंचन घोटाळ्यास जबाबदार असल्याचे नमूद केले आहे. त्यावरून राज्यभर वादळ निर्माण झाले असून त्याचे पडसाद आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा बैठकीतही उमटले. 

सरकारचा तीव्र निषेध 
चार वर्षांपासून भाजप सरकार राज्यात सत्तेत आहे. मात्र, या चार वर्षांत सिंचन घोटाळ्यासंदर्भात केवळ चर्चा आणि आरोपच झाले. त्यात काही तथ्य असते तर सरकारने कारवाई का केली नाही? चार वर्षांत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत, आणि आता केवळ वर्षभरातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजितदादांविरोधात एसीबीने प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यामागे राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई झाल्याचा आरोप करून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. पक्ष पूर्णपणे अजितदादांच्या पाठीशी असून आगामी काळात जिल्हाभरात या सूडाच्या कारवाईविरोधात आंदोलन छेडले जाईल, असेही बैठकीत ठरविण्यात आले. 

Web Title: marathi news jalgaon rashtrawadi congress ajit pawar