भाजपची सुडबुध्दी म्हणत राष्टवादी रस्त्यावर 

live photo
live photo

जळगाव/पारोळा ः राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर भाजपा सरकारने सुडबुध्दीने ईडीमार्फत गुन्हा दाखल केला. याचा निषेध व्यक्त करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यात जळगावात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तर पारोळ्यात देखील बंद पाडण्यात आला होता. 
पारोळ्यात आमदार डॉ. सतीष पाटील यांनी भाजप सरकारवर ताशेरे ओढत राज्याचे प्रश्न बाजुला करत महाजनादेश यात्रेला महत्व देणारे हे सरकार असुन विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना रोखले कसे जाईल; हा डाव ईडीच्यामार्फत आखण्याचे काम सरकारने केले आहे. यावेळी राष्टीय महामार्ग ते तहसिल कार्यालय सरकारविरोधात घोषणा देत आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जि. प. सदस्य रोहन पाटील, हिंमत पाटील, तालुकाध्यक्ष बाळु पाटील, युवक तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, जिल्हा चिटणीस डॉ. शांताराम पाटील, मनोराज पाटील, दिगंबर पाटील, उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, सदस्य अशोक पाटील, गणेश पाटील, संजय बागडे, अभिषेक पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. महामार्गावर राष्टवादी पदाधिकारी यांनी सरकार विरोधात घोषणा देत परिसर दणाणुन सोडला होता. यावेळी महामार्ग, बाजारपेठ परिसरात व्यापारी व विक्रेत्यांनी बंदला प्रतिसाद दिला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com