महाजनांना उत्तर देण्यास डॉ. सतीश पाटील समर्थ : वळसे-पाटील 

महाजनांना उत्तर देण्यास डॉ. सतीश पाटील समर्थ : वळसे-पाटील 

जळगाव : जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस संपविण्याची भाषा करणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना "राष्ट्रवादी'चे आमदार डॉ सतीश पाटील यांनी समर्थपणे उत्तर दिले आहे. एवढ्याशा यशाने हुरळून जाऊन आभाळाला हात टेकल्याचे महाजन यांनी दाखवू नये. जनतेला कधीही गृहीत धरू नये. विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनता निश्‍चित चित्र बदलवेल, असे मत विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिलीप वळसे- पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या. त्यास जिल्ह्याच्या सर्वच विधानसभा क्षेत्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात इच्छुकांची मोठ्या संख्येने गर्दी होती. यावेळी वळसे- पाटील म्हणाले, की राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची "आघाडी' निश्‍चित होणार आहे. जळगाव जिल्ह्यातही त्याचअनुषंगाने मुलाखती घेतल्या आहेत. जागावाटपासंदर्भातही चर्चा सुरू आहे. आवश्‍यक वाटल्यास त्यांच्यात आणि आमच्यात काही जागांची अदलाबदलही होऊ शकते. 

महाजनांनी जनतेला गृहीत धरू नये 
भाजपचे नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसला संपवून टाकू, अशी घोषणा केली. त्यांना आमचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनीही समर्थपणे उत्तर दिले आहे. महाजन यांनी जनतेला गृहीत अशा घोषणा करू नये. कारण, जनता चित्र बदलवू शकते. आगामी निवडणुकीत ते बदलणार आहे. कारण, राज्यात शेतकरी त्रस्त आहेत. तरुणांच्या हाताला काम नाही. राज्य कर्जबाजारी आहे. त्यामुळे जनता सरकारवर नाराज आहे. आगामी निवडणुकीत जनता निश्‍चितच बदल करून सरकारला धडा शिकवेन. 

निवडणुका "बॅलेट'वरच व्हाव्यात 
आगामी निवडणुका "बॅलेट'वरच व्हाव्यात, ही आमची मागणी कायम असल्याचे मतही वळसे- पाटील यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, की सर्वसामान्यांमध्ये "ईव्हीएम' निवडणकीबाबत संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे निवडणुकांत पारदर्शकता असावी यासाठी "बॅलेट'वरच त्या घ्याव्यात, यावर आम्ही ठाम आहोत. ती मागणी कायम असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com