loksabha 2019 : पाकच्या नावाने मते मागणारे नरेंद्र मोदी पहिलेच पंतप्रधान : आमदार आव्हाड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

जळगाव ः गेल्या पाच वर्षांपूर्वी अर्थात 2014 मधील निवडणुकीत नरेंद्र मोदींनी आशा निर्माण केली होती. परंतु त्यावेळी बोललेल्या कोणत्याही मुद्यावर आज ते बोलायला तयार नाहीत. आताच्या निवडणुकीत मात्र बेरोजगारी, महागाई, सुरक्षितता यावर न बोलता पाकिस्तानला धडा शिकविणार हेच बोलत आहेत. सत्ता मिळविण्यासाठी पाकिस्तानच्या नावाने मते मागणारे मोदी पहिलेच पंतप्रधान आहेत, असा आरोप "राष्ट्रवादी'चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज येथे केला. 

लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ आज शहरातील मेहरुण परिसरातील संतोषीमाता चौकात सायंकाळी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, माजी आमदार संतोष चौधरी, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, कॉंग्रेसचे डॉ. राधेश्‍याम चौधरी आदी याप्रसंगी उपस्थित होते. 
श्री. आव्हाड म्हणाले, की आजपर्यंत जे पाहिले नाही; ते या निवडणुकीत पाहावयास मिळत आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत खूप अंतर आहे. पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत मोदी ज्यावेळी भाषण करत होते तेव्हा आशा निर्माण करत होते. देश बदलणार, क्रांती घडणार, हे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद मोदींकडे पाहून वाटत होते. याच आशेने त्यांना भरघोस मते देऊन सत्ता दिली. मात्र, पाच वर्षे झाल्यावर त्यावेळी दिलेल्या मुद्यांवरून मोदी पळताय. आम्ही जे पाच वर्षे काम करतो, त्याचा दाम म्हणून मते मागतो. परंतु मोदी हे मुद्यांवरून पळतायत. नुसतेच पाकिस्तानला धडा शिकविणार, असे सांगून मोदी मते मागत आहेत.

Web Title: marathi news jalgaon rashtrawadi sabha awhad modi